तो दहशवादी बुलढाण्याचा असल्याचे स्पष्ट; पुणे एटीएसकडून झाली होती कारवाई; दहशतवादी संघटनेसाठी जमवायचा पैसे

| Updated on: Aug 24, 2022 | 1:02 PM

सोशल मीडियाद्वारे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो आला असल्याने त्याला पुण्यातून एटीएसकडून अटक करण्यात आली होती. अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याप्रकरणी त्याला पुण्यातील दापोडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती.

तो दहशवादी बुलढाण्याचा असल्याचे स्पष्ट; पुणे एटीएसकडून झाली होती कारवाई; दहशतवादी संघटनेसाठी जमवायचा पैसे
Follow us on

पुणेः पुणे एटीएसकडून (Pune ATS) अटक करण्यात आलेला जुनेद मोहम्मद (Junaid Mohammed) या अतिरेक्यावर काल आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गोंधनापूर (Gondhnapur Buldhana) या गावचा रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्याच्या घरी कोणीही नसल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आले असून त्याच्या घरातील सर्व सदस्य हे पुणे येथे गेले असल्याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या त्याच्या घरी फक्त कुटुंबातील वृद्ध आजी आणि आजोबा असून त्याच्या कुटुंबीयातील सर्व सदस्य पुण्यात आल्याचे समजल्याने कुटुंबीयांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरु आहे. जुनेदविषयी माहिती घेण्याचे काम सुरु असले तरी त्याच्या गोंधनापूरमधील नागरिकांना मात्र त्याची माहिती घेण्यास नकार दिला आहे. सध्या त्याच्या घरी कुणीही राहत नसून घरात फक्त त्याचे वृद्ध आजी आजोबा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जुनेद हा दोन वर्षांपूर्वी ईदसाठी गावात आला होता, मात्र कॅमेऱ्यासमोर त्याच्याविषयी माहिती देण्यास कुणीही तयार होत नव्हते. गोंधनापूर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते.

गाव सोडून आला होता पुण्यात

त्यानंतर त्याने शिक्षण सोडून पुणे येथे थोडे दिवस वास्तव्य केले होते. आजही त्याच्या गावातील घरी कुणीही राहत नसून गावातील गावातील नागरिक त्याच्या कुटुंबीयांविषयी आजही कुणी बोलायला तयार होत नाहीत.

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात

सोशल मीडियाद्वारे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो आला असल्याने त्याला पुण्यातून एटीएसकडून अटक करण्यात आली होती. अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याप्रकरणी त्याला पुण्यातील दापोडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती.

बँक खात्यात पैसे

जुनेद मोहम्मद हा समाजमध्यमाद्वारे काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी जुनेदच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते, त्यानंतर तो त्य दहशतवादी संघटनेच्या अधिकच संपर्कात आल्याने त्याला एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले होते.