TET Exam Scam | एकाच एजंट ‘1126’ परीक्षार्थींना पास केल्याचं तपासात उघड; अपात्र परीक्षार्थींचा शोध सुरु

आरोपी संतोष हरकळकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील माहितीच्या आधारे 1270 परीक्षार्थीची नावे, सीटनंबर, जात अशी नोंद असलेली एक्सेल शीट पोलिसांना मिळाली आहे. त्याच्यावरून 1270 ० परीक्षार्थीची यादी पैकी 1126  परीक्षार्थीचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता या यादीतील कोण कोणत्या परीक्षार्थींना मुकुंद सूर्यवंशी याने संपर्क केला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.

TET Exam Scam | एकाच एजंट '1126' परीक्षार्थींना पास केल्याचं तपासात उघड; अपात्र परीक्षार्थींचा शोध सुरु
pune-police
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 3:07 PM

पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेतील(Teacher Eligibility Test)  घोटाळा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चालला आहे. या घोटाळ्यात (Scam)समावेश असलेल्या अनेक आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 2019-20 परीक्षेमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने इतरा एजंटसोबत संगनमत करुन तब्बल 7  हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन त्यांना पात्र केले. त्यातील एका एजंटाकडील तब्बल 1 हजार 126 अपात्र परीक्षार्थींना पात्र केलेल्या सायबर पोलिसांच्या (Cyber Police) तपासात निष्पन्न झाले आहे. टीईटी परीक्षा 2019-20  मधील अंतिम निकालात 16 हजार705  परीक्षार्थींना पात्र केले होते. त्यापैकी नाशिक विभागामधील अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याची संख्या 2 हजार770 इतकी असून ती इतर कोणत्याही विभागाच्या तुलनेत जास्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सूर्यवंशीला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणातील मुख्य आरोपी पैकी एक असलेल्या मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यवंशी याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपी सूर्यवंशी हा शिक्षक असून यातील एक आरोपी राजेंद्र सोळुंके व मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपात्र परीक्षार्थींचा शोध सुरु

आरोपी संतोष हरकळकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील माहितीच्या आधारे 1270 परीक्षार्थीची नावे, सीटनंबर, जात अशी नोंद असलेली एक्सेल शीट पोलिसांना मिळाली आहे. त्याच्यावरून 1270 ० परीक्षार्थीची यादी पैकी 1126  परीक्षार्थीचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता या यादीतील कोण कोणत्या परीक्षार्थींना मुकुंद सूर्यवंशी याने संपर्क केला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.

Surya Grahan 2022 | या तारखेला होणार 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण, 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल: देवेंद्र फडणवीस

उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल: देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.