TET Exam Scam | कोण आहे IAS सुशील खोडवेकर ज्याला टीईटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय?

| Updated on: Jan 29, 2022 | 7:51 PM

TET Exam Scam टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर याला ठाण्यातून अटक केली. खोडवेकर याला दुपारी अटक केल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 31 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

TET Exam Scam | कोण आहे IAS सुशील खोडवेकर ज्याला टीईटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय?
कोण आहे IAS सुशील खोडवेकर ज्याला टीईटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय?
Follow us on

पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर ( Sushil Khodvekar)  याला ठाण्यातून अटक केली. खोडवेकर याला दुपारी अटक केल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 31 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली असून पुढचा नंबर कुणाचा अशी चर्चाही सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) खोडवेकर याला अटक केली आहे. यापूर्वीही पोलिसांनी टीईटी घोटाळ्याप्रकरणी अनेकांची धरपकड केली आहे. मात्र, सनदी अधिकाऱ्याला पहिल्यांदाच अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेले सुशील खोडवेकर कोण आहेत? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

कोण आहेत सुशील खोडवेकर

सुशील खोडवेकर 2009 च्या बॅचचा आयएएस अधिकारी असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून काम केलं आहे. सध्या खोडवेकर कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहे. टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले. त्यानंतर या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट त्यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात खोडवेकरने आर्थिक व्यवहार केल्याचीही माहिती मिळत आहे.

आतापर्यंत 36 जणांना अटक

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करणअयात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आता 2018 च्या घोटाळ्यातील आरोपी सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली. ही परीक्षा 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक म्हणून सुखदेव डेरे यांच्याकडे चार्ज होता. आम्ही त्यांना अटक केली आहे. यापूर्वीच आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी घोटाळा प्रकरणी जी ए टेक्नॉलॉजीचे आश्विनकुमार होते, त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रीतिश देशमुख, हरकळचे दोन्ही भाऊ आणि सावरीकर यांनाही अटक केली आहे.

 

संबंधित बातम्या:

TET Exam Scam | सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

Wine in Maharashtra: किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल; आठवलेंनी उडवली ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाणार?; कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय