Mission Admission | पुण्यात अकरावी प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची (11th Admission) अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) उद्या जाहीर होणार आहे.

Mission Admission | पुण्यात अकरावी प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार
पुणे, पिंपरी चिंचवड 11 वी प्रवेश

पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची (11th Admission) अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) उद्या जाहीर होणार आहे. या विभागांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया (Online Admission) राबवण्यात येत आहे. त्यानुसार 25 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. (The final general merit list for the eleventh admission in junior colleges will be announced tomorrow)

बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार आणि मंगळवारी या अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पहिल्या अकरावी प्रवेशाच्या फेरीसाठीची पुढची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

27 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेचा पुढचा टप्पा

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मेरीट नंबर देण्यात येईल. पहिल्या फेरीसाठीची अलॉटमेंट जाहीर होईल. त्यानंतर 27 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कटऑफ वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील. 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचं कॉलेज निश्चित करायचं आहे.

30 ऑगस्टला 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जाता वेबसाईटवर जाहीर केल्या जातील.

अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 125 जागा उपलब्ध

यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतल्या 310 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 125 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 77 हजार 285 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी 69 हजार 22 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरून लॉक केले आहेत. तसेच 68 हजार 367 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 59 हजार 886 विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा दुसरा भाग भरून पूर्ण केला आहे.

संबंधित बातम्या :

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?

31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा सदनिका रद्द! PMRDAचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI