AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cycling for fitness |फिटनेसच्या संदेशासाठी पोलीस अधिकाऱ्याचा अनोखा उपक्रम; चक्क देहू ते पंढरपूर 234 किमीची सायकल वारी

व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देहू ते पंढरपूर असा सायकलवरून प्रवास करायच ठरवले होते. देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे.

cycling for fitness |फिटनेसच्या संदेशासाठी पोलीस अधिकाऱ्याचा अनोखा उपक्रम; चक्क देहू ते पंढरपूर 234 किमीची सायकल वारी
Ram gomate
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 7:00 AM
Share

पिंपरी – कोरोनामुळे सर्वांच्याच जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कोरोनाच्या लाटेनंतर प्रत्येकजण रोगप्रतिकारक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम याला महत्व देताना दिसून येत आहे. तंदुरुस्त आरोग्यकडे तरुणांपासून वयोवृद्ध देखील भर देताना पाहायला मिळत आहे. यामुळे फिटनेसचा संदेश देण्यासाठी राम गोमारे या पोलीस अधिकाऱ्याने चक्क देहू ते पंढरपूर अशी 234 किलोमीटर सायकल वारी केली आहे. राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

फिटनेसला महत्त्व राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि धावण्याचा व्यायाम सुरू ठेवला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेदेखील फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. त्यांचाच आदर्श समोर ठेवत राम गोमारे यांनीही फिटनेसला महत्त्वा दिले आहे. मात्र, आपण स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांना देखील फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असे गोमारे यांनी म्हटले आहे.

स्वतःसाठी एक तास व्यायाम करा

व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देहू ते पंढरपूर असा सायकलवरून प्रवास करायच ठरवले होते. देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे. सलग आठ तास सायकल चालवत राम गोमारे यांनी देहू ते पंढरपूर असा २३४ किलोमीटर प्रवास केला आहे. त्यामुळे गोमारे यांनी पंढरपूर पर्यंत फिटनेस वारीच केली आहे. करोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं सांगत राम गोमारे यांनी दररोज किमान एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा डंका, मुंबईची भावना यादव देशात मुलींमधून प्रथम

Bhiwandi: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा

मांडवी नदीवरील बंधाऱ्यांचा भराव गेला वाहून, पिकांचे नुकसान

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...