Pune crime : ‘…नाहीतर गे असल्याचं व्हायरल करू’; पुण्यातल्या तरुणाला शरीरसुखाचं आमिष दाखवत रात्रभर डांबून ठेवलं; चौघांना बेड्या

| Updated on: Jun 02, 2022 | 5:09 PM

आरोपींनी केवळ पैसेच घेतले नाहीत, तर फिर्यादी तरुणास रात्रभर खोलीतच डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून दिले. त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Pune crime : ...नाहीतर गे असल्याचं व्हायरल करू; पुण्यातल्या तरुणाला शरीरसुखाचं आमिष दाखवत रात्रभर डांबून ठेवलं; चौघांना बेड्या
खडक पोलीस ठाणे (संग्रहित छायाचित्र)
Follow us on

पुणे : महाविद्यालयीन तरुणाला शरीरसुखाचे आमिष दाखवत रात्रभर डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन (Khadak police station) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील एका महाविद्यालयात हा विद्यार्थी एमबीए (MBA) करत आहे. या तरुणाला पुण्यात चौघांनी शरीरसुखाची ऑफर देत बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवले. त्याच्याजवळचे सर्व पैसे काढून घेतले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत, तर त्याला समलिंगी (Gay) असल्याचे सर्वत्र व्हायरल करेन, अशी धमकीही दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यातील एक रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

तरुणाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 24 वर्षीय तरुणाने या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवस्तीत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून फिर्यादी तरुणाचा काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मोबाइल काढून घेण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी त्याच्या मोबाइलवरून ऑनलाइन 55 हजार 679 रुपयेदेखील ट्रान्सफर करून घेतले.

हे सुद्धा वाचा

पकडलेल्या चार आरोपींमधील एक रेकॉर्डवरील गुन्हेगार

आरोपींनी केवळ पैसेच घेतले नाहीत, तर फिर्यादी तरुणास रात्रभर खोलीतच डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून दिले. त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी तरुणाच्या तक्रारीनंतर पुण्यातील खडक पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीमध्ये साहिल कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी, कुठेही जाण्यापूर्वी मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नये, सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.