
कोथरुड पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय. तीन दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आला. आता मुलींनी आपल्यासोबत चार तास काय काय घडले याचा पाढाचा वाचून दाखवलाय. कंबरेमध्ये पोलिसाने लाथा घातल्या. फक्त हेच नाही तर एका पीएसआयने चुकीचे स्पर्श केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुळात म्हणजे हे सर्व प्रकरण छत्रपती संभाजीनगरचे आहे. एक विवाहित महिला आपल्या पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आली. तिचे सासरे माजी पोलिस अधिकारी आहेत. यावेळी पुण्यात आल्यांतर महिलेने आपल्या मैत्रिणींची मदत घेतली. त्याच मैत्रिणींच्या घरी पोलिस शिरले आणि त्यांच्यासोबत अत्यंत चुकीचे वर्तवण करण्यात आल्याचे आरोप मुली करत आहेत.
पीडितेने तक्रारीत सुरूवातीपासून काय घडले हे आता सांगितले आहे. माझ्या मैत्रिणीचे सासरे, यासोबत पीएसआय कामठे, सानप, शिंदे हे आमच्या घरी आले. यावेळी त्यांनी आमच्या सर्व घर तपासले, त्यांनी आमच्या बाथरूममध्ये जाऊन आमच्या चक्क इनरवेअर देखील तपासल्या. घाण घाण ते बोलत होते. त्यानंतर आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन चार तास मारहाण देखील केली.
पीडिता पुढे तक्रारीत म्हटले, माझ्या कंबरेत लाथा घातल्या. हेच नाही तर कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझा पूर्ण मोबाईल बघितला. त्यांनी माझे खासगी चॅट वाचले. त्यांच्याकडून सतत माझी जात विचारली जात होती. माझ्या मोबाईलमधील फोटो पाहून मजा करते…या दोघांपैकी तुझा बॉयफेंड कोणता हे देखील विचारण्यात आले. कोथरुड पोलिसांनी फक्त मारहाणच केली नाही तर मानसिक छळ केला.
पोलिस माझं शरीर न्याहाळत होते. वाईट नजरेने बघितले जात होते. यावेळी तिथे महिला कॉन्स्टेबल होत्या, पण त्या देखील मजा घेत होत्या. हेच नाही तर पीएसआय कामठे माझ्या अंगावर आले. त्यांनी मला चुकीचा स्पर्श केला. त्यांच्या हनुवटीचा घाणेरडा स्पर्श माझ्या शरीराला झाला होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. महिला कॉन्स्टेबलकडूनही विचित्र प्रश्न विचारली जात होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.