AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | पुण्यातील पेठांनी भाजपकडे पाठ फिरवली, आकडे समोर

कसबा निकालावरुन अजूनही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान मतदानाच्या आकडेवारीवरुन पेठांमधले मतदार 2019 प्रमाणे भाजपसोबत राहिले नाहीत. हे आकडेवारी सप्ष्ट झाल्याचं बोललं जातंय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | पुण्यातील पेठांनी भाजपकडे पाठ फिरवली, आकडे समोर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 04, 2023 | 11:40 PM
Share

पुणे : जिथं दिग्गजांची प्रतिष्ठा पणावर होती, तिथं निकालानंतर राजकारण विसरुन रविंद्र धंगेकरांनी केलेल्या कृतीचं कौतुक होतंय. सध्या नेतेमंडळी एकमेकांशी वैऱ्यासारखे वागतायत. पण विजयानंतर रविंद्र धंगेकर आधी दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या घरी गेले. टिळकांच्या फोटोला नमस्कार करुन त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. इकडे निकालावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. कसब्यातला पराभव हा सरकारविरोधातला रोष असल्याचं राऊत म्हणतायत. तर भाजप नेते सुधीर मुनंगटीवारांनी पराभवाबद्दल चिंतनाची गरज व्यक्त केलीय. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावानं सोशल मीडियात व्हायरल झालेली एक पोस्टही चर्चेत राहिली.

दाव्याप्रमाणे गडकरी असं म्हणतायत की कसब्यात निवडणूक ही आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. खरंच फडणवीसांनी शिंदेंना सोबत घेऊन चूक तर केली नाही ना? जनता विश्वासघात खपवून घेत नाही. मात्र ही पोस्ट सपशेल खोटी आहे. गडकरींनी अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट नेमकी कुणी व्हायरल केली, त्याचा स्रोत काय होता? याच्या चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पेठांमधून दोन्ही उमेदवारांना किती-किती मते मिळाली?

दुसरीकडे पेठांमधला पारंपरिक मतदार दूर गेल्यामुळे भाजपला फटका बसल्याचं आकडेवारी सांगतेय. एकट्या शनिवार आणि सदाशिव पेठेतून भाजपच्या धंगेकरांना लीड मिळालं, मात्र ते गेल्यावेळच्या तुलनेत कमी होतं.

सदाशिव आणि शनिवार पेठेतून रासनेंना 21763 तर धंगेकरांना 14557 मतदान मिळालं. रासनेंचं 7206 मतांचं लीड राहिलं. कसबा आणि सोमवार पेठेत रासनेंना 6033, धंगेकरांना 10594 मतं मिळाली. म्हणजेच धंगेकरांना 4561 मतांचं लीड मिळालं. रास्ता पेठ आणि रविवार पेठेत रासनेंना 10639, धंगेकरांना 16714 मतं मिळाली. त्यामुळे धंगेकरांचं इथे 6075 मतांचं लीड राहिलं. नवी पेठ-पर्वतीमधून रासनेंना 8498, धंगेकरांना मिळाली 10176 मतं मिळाली. म्हणजे धंगेकरांना इथे 1678 मतांचं लीड मिळालंय

सदाशिव आणि शनिवार पेठेत गेल्यावेळी मुक्ता टिळकांना 20 हजारांहून जास्तीचा लीड होता. त्यापैकी रासने फक्त 7206 च मतं मिळवू शकले. तूर्तास निवडणूक झाली असली तरी कसब्यावरुन आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत