राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटणार, ॲक्शन घेता येत नसेल तर महाराजांचं नाव घेऊ नका; उदयनराजे यांनी सुनावले

| Updated on: Nov 28, 2022 | 4:01 PM

ज्या राज्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो, त्या राजासाठी तुम्ही कधी जागे व्हाल? त्यांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना. त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटणार, ॲक्शन घेता येत नसेल तर महाराजांचं नाव घेऊ नका; उदयनराजे यांनी सुनावले
राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटणार, अॅक्शन घेता येत नसेल तर महाराजांचं नाव घेऊ नका; उदयनराजे यांनी सुनावले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. राज्यपालांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी उदयनराजे भोसले थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही कारवाई झाली नाही. कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दातच उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. तसेच या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये. हा मुद्दा राजकारण म्हणून पाहू नये, असं आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केलं.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांनी या प्रकरणावर अॅक्शन घ्यावी. घेतली नाही तर मग शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी सुनावले.

हे सुद्धा वाचा

मला पुढचं दिसतं. हा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आज याने काही बोलायचं उद्या त्याने काही बोलायचं. किती अवहेलना सहन करायची? पण आता आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

येत्या आम्ही 3 डिसेंबर रोजी आम्ही रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाणार आहोत. तिथे आम्ही आक्रोश आंदोलन करणार आहोत. हे प्रतिकात्मक आक्रोश आंदोलन असेल. यावेळी आम्ही आमच्या वेदना व्यक्त करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

ज्या राज्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो, त्या राजासाठी तुम्ही कधी जागे व्हाल? त्यांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना. त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान.

काही लोक म्हणतात जुना विचार. मग नवीन विचार सांगा ना? प्रत्येकाचा आदर्श आजही महाराजच आहे. प्रत्येक धर्माचा शिवाजी महाराजांनी सन्मान केला. प्रत्येक धर्मस्थळांना इनाम दिलं. त्या राजाचा अपमान होत असताना आपण शांत राहणार का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.