शिवाजी महाराजांवर विकृत लिखाण केलं जातं, तेव्हा तुम्हाला राग कसा येत नाही? उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 3:45 PM

3 डिसेंबरला मी सकाळी 7 वाजता रायगडला शिवाजी महाजरांच्या समाधीस्थळ जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवाजी महाराजांवर विकृत लिखाण केलं जातं, तेव्हा तुम्हाला राग कसा येत नाही? उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल
Image Credit source: social media

साताराः छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) विकृत लिखाण केलं जातं, भाषणातून त्यांची अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही? त्यांचं नाव घेता, विचार सांगता, मग अपमान झाल्यावर तुम्हाला राग कसा येत नाही, असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केल आहे. राज्यपाल(Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वक्तव्यावरून उदयनराजे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. साताऱ्यात आज त्यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. 3 डिसेंबरला मी सकाळी 7 वाजता रायगडला शिवाजी महाजरांच्या समाधीस्थळ जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

उदयनराजे म्हणाले, ‘ शिवाजी महाराजांची लिखाण आणि भाषणातून अवहेलना केली जाते. तेव्हा राग कसा येत नाही? नाव त्यांचं घ्यायचं विचार सांगता मग तुम्हाला राग कसा येत नाही? वेगवेगळे पक्ष असले तरी तुमचा अजेंडा वेगळा असू शकतो. महाराजांचं नाव घेता तेव्हा तुमचा मूळ अजेंडा शिवाजी महाराजांचे विचारच आहे. नसेल तर महाराजांचं नाव का घ्यायचं?

शिवाजी महाराज यांच्याबाबतचं हे विकृतीकरण थांबवलं नाही तर पुढच्या पिढीसमोर सोयीने मांडलेला मोडलेले तोडलेला इतिहास जाईल. त्यांना काय खरा इतिहास समजणार. त्यांना वाटेल हाच खरा इतिहास आहे. ही एकटी माझी जबाबदारी नाही. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं.

ज्या महाराजांनी संपूर्ण सर्वधर्म समभावाचे विचार दिले. आदर्शाचे विचार दिले. आज नेमके वेगवेगळे लोकं टीका करत आहेत. केवळ स्वार्थापोटी सर्व पक्ष अपवाद कोणीच नाही. प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो प्रत्येकजण महाराजांना आदर्श मानतात, मग त्यांच्या अपमानानंतर आपल्याला राग का येत नाही, असा सवाल उदयनराजे यांनी केला. लवकरच आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं उदयन राजे म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर नितीन गडकरी आणि शरद पवार हे नव्या काळातील आदर्श आहेत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या याच विधानावरून जोरदार टीका होत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI