रस्ता कधी सुरु होणार, राजेंनी हिंदी डायलॉग फेकला, म्हणाले ‘अभी के अभी’

| Updated on: Jan 08, 2021 | 1:33 PM

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी आज ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांना धक्का दिला.

रस्ता कधी सुरु होणार, राजेंनी हिंदी डायलॉग फेकला, म्हणाले अभी के अभी
उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली
Follow us on

सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी आज सातारा शहरातील पोवई नाका (Satara Powai Naka) येथील ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांना धक्का दिला. “मी आदत से मजबूर” असून असे धक्के द्यायची मला सवय आहे. कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मलाही बसतात, असं उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं. (Udayanraje Bhosale dialogue)

सर्वसामांन्यासाठी हा रस्ता कधी सुरु होणार याबाबत बोलताना हिंदी चित्रपटातील ‘अभी के अभी’ हा डायलॉग मारायलादेखील ते विसरले नाहीत. यावेळी उदयनराजे यांनी कॉलर उडवत, जशी इतरांची स्टाईल असते, तशी माझीही स्टाईल आहे. मला कोणी शाबासकी देवो अगर ना देवो ही माझी पद्धत आहे, असं म्हणाले.

उदयनराजेंचं स्टाईल स्टेटमेंट

खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवून डायलॉग असो किंवा कार्यकर्त्याच्या बाईकची सुपरफास्ट राईड असो, उदयनराजे आपल्या अंदाजात व्यक्त होतात. त्यामुळे उदयनराजेंभोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असतो. उदयनराजे भोसलेंचं इंग्रजी असो की डॉल्बी लावून केलेला डान्स, नेहमीच लक्षवेधी असतं.

उदयनराजे भोसले

उदयनराजेंचं ट्विट

दरम्यान, उदयनराजेंनी साताऱ्यातील ग्रेडसेपरेटर उद्घाटनाबाबतची फेसबुक पोस्ट केली आहे. “सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटर चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे हा ग्रेडसेपरेटर आजपासून जनतेच्या सेवेत आम्ही मोठ्या आनंदाने सुपूर्त करत आहोत. सातारकर आणि जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत दिलेले प्रेम व आशीर्वाद याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आम्ही करू शकत नाही हेच प्रेम व आशीर्वाद आम्हास आपली मनोभावे सेवा करण्याची ताकद देते”, असं उदयनराजे म्हणाले.

(Udayanraje Bhosale dialogue)

उदयन राजे यांचा हिंदी डायलॉग :


संबंधित बातम्या 

Special Report | पुण्यात लग्न समारंभात उदयनराजे आणि रामराजेंची गळाभेट