AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 वर्षे वेदना सहन केल्या, पण आता…; मुरलीधर मोहोळ रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर पुण्यातील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत पुन्हा बळावल्याने डॉक्टरांनी त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

29 वर्षे वेदना सहन केल्या, पण आता...; मुरलीधर मोहोळ रुग्णालयात, नेमकं काय घडलं?
Murlidhar Mohol Leg Surgery
| Updated on: Mar 15, 2026 | 8:55 AM
Share

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांना आता किमान एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

२९ वर्षांपूर्वी कुस्ती सोडण्याचे ठरले होते कारण

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे त्यांचे कुस्तीचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे त्यांना कुस्ती कायमची सोडावी लागली होती. इतकी वर्षे त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा त्रास प्रचंड वाढला होता. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना

या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती! २९ वर्षांपूर्वी कोल्हापूरला कुस्ती खेळताना झालेली दुखापत आता असह्य होऊ लागली होती. संसदेचे अधिवेशन सुरू असताना आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तोंडावर असताना ही शस्त्रक्रिया करावी लागली, याचे शल्य आहे. कामाचा व्याप आणि लोकांचा संपर्क सुटत असल्याचा त्रास दुखापतीपेक्षा जास्त होतोय. पण तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन पुन्हा जनसेवेत हजर होईन, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र तरी डॉक्टरांनी त्यांना हालचाल कमी करण्याचा आणि पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील एक महिना त्यांचे दिल्लीतील अधिवेशन दौरे, पुणे लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रम आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपस्थिती यावर मर्यादा येणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!