Modi In Pune: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं अनावरण, शिवरायांवर मोदींकडून फुलांचा वर्षाव

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले

Modi In Pune: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं अनावरण, शिवरायांवर मोदींकडून फुलांचा वर्षाव
PM Narendra Modi
| Updated on: Mar 06, 2022 | 12:36 PM

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)  आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.  तब्बल ६० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आलेले मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.

आसनारुढ पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट  

शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या महात्मा जोतिबा फुले हे 1876 ते 1882  या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ यांनी छत्रपतीची आसनारुढ पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट दिली.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण संपन्न 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात शाही स्वागत, फेट्यातील राजमुद्रेला काँग्रेसचा विरोध

Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर चालणार ‘हा’ ट्रेंड