Valentine’s Day च्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पुण्यातील गुलाब उत्पादकांसाठी घेऊन आले अच्छेदिन…! निर्यातीत मोठी घट

मावळातील या लाल, गुलाबी आणि पांढऱ्या गुलाबाला विशेष महत्व आहे. दरवर्षी हाच गुलाब परदेशात मोठ्या प्रमाणावर गुलाब उत्पादक पाठवत असतात परंतु ह्याच गुलाबाच्या फुलांना देशातच मागणी आणि दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कल स्थानिक बाजारपेठेकडेच जास्त असल्याचं दिसून येत आहे

Valentines Day च्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पुण्यातील गुलाब उत्पादकांसाठी घेऊन आले अच्छेदिन...! निर्यातीत मोठी घट
Valentine's Day
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 4:11 PM

पुणे – व्हॅलेंनटाईन डे (Valentine’s day)ला पुण्याच्या मावळ (Maval)मधून मोठ्या प्रमाणावर गुलाब (Rose)हा परदेशात जात असतो. परंतु, यावर्षी उलट चित्र पाहायला मिळतंय. 40 टक्के परदेशात तर 60 टक्के स्थानिक बाजारपेठेत गुलाब विकला जात आहे. त्यामुळं गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत अस म्हणावं लागेल. मावळातील या लाल, गुलाबी आणि पांढऱ्या गुलाबाला विशेष महत्व आहे. दरवर्षी हाच गुलाब परदेशात मोठ्या प्रमाणावर गुलाब उत्पादक पाठवत असतात परंतु ह्याच गुलाबाच्या फुलांना देशातच मागणी आणि दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कल स्थानिक बाजारपेठेकडेच जास्त असल्याचं दिसून येत आहे. यावर्षी लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रमांमुळे भारतात स्थानिक बाजारपेठेत गुलाब भाव खात आहे.

स्थानिक बाजारपेठेत भाव वधारला
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशातील बाजार पेठेत एका गुलाबाला 13 ते 14 रुपये भाव मिळत आहेत. या उलट स्थानिक बाजारपेठेत ह्याच गुलाबाच्या फुलाला 17 ते 18 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होत असल्यचीच माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. गुलाबाच्या उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकरीराजा सुखवला आहे. यावर्षी गुलाबाच्या फुलांची परदेशात निर्यात 40 टक्के झालीय व स्थानिक बाजारपेठेत 60 टक्के फुले विक्रीसाठी गेली आहेत.

दोन वर्षांपासून गुलाब उत्पादक शेतकरी हा हैराण होता. यावर्षी मात्र गुलाब उत्पादकांना भारतातील स्थानिक बाजार पेठेने तारले असून कित्येक वर्षातून असा योग्य आला आहे. त्यामुळं यावर्षीचा व्हेंलनटाईन प्रेमी युगलांसह गुलाब उत्पादकांसाठी विशेष ठरत आहे. अशी माहिती शेतकरी दिलीप दळवी यांनी दिली आहे.

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा

कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? – सदाभाऊ खोत

मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!