कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? – सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) गोव्यातही (Goa Elections 2022) भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात केला आहे.

कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? - सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 4:28 PM

गोवा : पाच राज्यात सध्या निवडणुकांचा प्रचार (Five State Election) अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष पायला भिंगरी बांधून प्रचारात उतरले आहेत. राज्यात भाजपचे सहयोगी असणारे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) गोव्यातही (Goa Elections 2022) भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात केला आहे. त्यांनी गोव्यात संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे. जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत गोव्यात बीजेपीची सत्ता येणार नाही असं म्हणणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बोलाचाच भात बोलाचीच कढी

हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, फक्त तोंडाची वाफ घालवण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे त्या माणसाला फार गणतीत धरणं आवश्यक नाही, असा हल्लाबोल त्यांनी राऊतांवर चढवला आहे. शेजारच्या घरात पाळणा हल्लायला लागला की आपल्या हातात दोरी येईल असे यांना वाटतंय, पण असं होत नसतं, कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हलत असतो. यांच्याकडे पाळणा कसा हलेल वांझोट्या ना लेकरं बाळ होत नसतात, अशी घणाघाती टीका त्यांना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ओबीसी अहवाल सादर प्रकरण

ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकासआघाडी गेली अडीच वर्षे केंद्राकडे बोट दाखवते आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता दोन महिन्यात अहवाल कसा काय तयार झाला? याचा अर्थ राज्यातील ओबीसी आरक्षण घालवण्याचे काम या आघाडी सरकारने केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप हे महाविकास आघाडी सरकारचे होते हे आता सिद्ध झाले. वरातीमागून आता घोडं चाललंय त्यामुळे अनेक निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. आता तरी सरकारने सजग राहून न्यायालयामध्ये योग्य ती बाजू मांडावी, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

वाढदिवसाचं औचित्य, शिंदेंचा मुख्यमंत्री बनण्याचा इरादा पक्का? ठाण्यातील पोस्टर्सनी चर्चांना उधाण

ओवेसींवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण? किती जण घेतले ताब्यात? अमित शाह यांनी दिलं उत्तर

Rahul Gandhi Security | पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक; तरुणाने फेकलेला झेंडा थेट तोंडावर आपटला, विरोधकांच्या हाती कोलीत!

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.