Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी उचलले मोठे पाऊल! थेट पोलिस, मनपा यांना…

गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण व्यापक स्वरूप देण्यासाठी विद्यानंद बापट यांच्या वतीने कायदेशीर नोटीस पाठवण्यात आले आहे. गणेशोत्सवातील ध्वनी व वायुप्रदूषण आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात पुणे पोलीस, मनपा, MPCB आणि DGP यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी उचलले मोठे पाऊल! थेट पोलिस, मनपा यांना...
| Updated on: Sep 12, 2026 | 11:49 AM

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात ध्वनी, वायू व कचरा प्रदूषण रोखण्यासाठी आणि मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुण्यातील नागरिक श्री. विद्यानंद सुहास बापट यांच्या वतीने कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे व त्यांच्या टीमने संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे.

कोणाला नोटीस पाठवली?

Loading...

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) प्रादेशिक अधिकारी यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली.

असीम सरोदे काय म्हणाले?

असीम सरोदे यांनी म्हटले की, गणेशोत्सव दरम्यान या नोटिस बाबत कारवाई करावी नाही तर आम्ही गणेशोत्सव नंतर या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करणार नोटीस दिल्यानंतर तीन दिवसात उत्तर नाही दिले तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. सर्व सणामधील कोणीही असे वागू नये. पोलिसांना सगळे माहिती आहे. सामजिक प्रबोधन सर्व मार्गाने झाले पाहिजे. भावना दुखावणे म्हणणे आता थांबवले पाहिजे. राजकीय लोकांना यामुळे लोकप्रियता मिळते त्यामुळे त्याच्या पाठिंब्यामुळे अशा प्रवृत्तीना प्रोत्साहन दिले जाते. झुंडी समोर पोलिस यंत्रणा कमी पडते. धर्म आणि उत्सव राहिले पाहिजेत. ढोल ताशा बाबतही सामुहिक आवाज होतो त्यामुळे ते ही चालणार नाही.

नोटीसीतील प्रमुख मागण्या

1. अॅम्प्लीफायर, डीजे व लेझर शोवर बंदीः उत्सवादरम्यान उघड्या सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या अॅम्प्लीफायर यंत्रणा, डीजे आणि लेझर शोच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात यावी.

2. न्यायालय व हरित nyaydhikaranachya आदेशांचे पालनः मा. मुंबई उच्च न्यायालय (डॉ. महेश बेडेकर याचिका) आणि मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. ढोल-ताशा पथकांवर मर्यादा घालणे आणि रुग्णालये, न्यायालय व शाळांभोवती १०० मीटरचे ‘सायलेन्स झोन’ पाळणे बंधनकारक करावे.

3.मंडपांची पाहणी व वाहतूक नियंत्रणः मनपाने सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या गणपती मंडपांची तात्काळ पाहणी करावी. पादचाऱ्यांना, रुग्णवाहिकांना व अग्निशामक दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणारे मंडपांचे स्थलांतर करावे, तसेच अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी.

4.वातावरणातील हवा व घनकचरा प्रदूषण नियंत्रण: CO₂ कॉन्फेटी कॅनन फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर बंदी आणून रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले ब लावावेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us