रेमडेसिवीर, लसीकरणाबाबत पुरंदरशी भेदभाव; शिवसेना नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

| Updated on: Apr 19, 2021 | 1:03 PM

राज्यात लसीकरण आणि रेमडेसिवीरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. (vijay shivtare on remdesivir shortage in purandar)

रेमडेसिवीर, लसीकरणाबाबत पुरंदरशी भेदभाव; शिवसेना नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर
vijay shivtare
Follow us on

पुणे: राज्यात लसीकरण आणि रेमडेसिवीरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदरशी भेदभाव होत असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच रेडेसिवीरच्या तुटवड्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (vijay shivtare on remdesivir shortage in purandar)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आणि रेमडेसिवरची तुटवडा भासत आहे. तसेच लसीकरणही थांबलं आहे. त्यामुळे विजय शिवतारे संतापले आहेत. आज त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा संताप व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही. माझी प्रशासनावरची नाराजी आहे, असं शिवतारे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी आणि एफडीए यांच्या कारवाईवर संशय असल्याचंही ते म्हणाले.

पुरंदरवर अन्याय

पुरंदरमध्ये 1800 रुग्ण आहेत. मात्र तालुक्याला केवळ 225 रेमडेसिवीर मिळाल्या आहेत. लसीकरणाबाबतही आमच्यावर अन्याय झालाय. पुरंदरमध्ये कोरोनाच जास्त धोका असताना फक्त 34 हजार लसीकरण झालं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र दुपटीने लसीकरण झालं आहे. प्रशासनाकडे 200 बेडसाठी परवानगी मिळावी असी मागणी करण्यात आली असून ऑक्सिजनचाही तातडीने पुरवठा झाला पाहिजे, असं शिवतारे म्हणाले.

ब्लॅक मार्केटिंग सुरू

आमच्याकडे इथेनॉल प्लान्ट आहे. त्यात जागा आहे. तिथं ऑक्सिजन प्लान्टची परवानगी दिली. कोविड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत आहे. तालुक्यात औषधांचं मोठ्याप्रमाणावर ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे. प्रशासन चांगलं काम करतंय, पण आमच्याकडे दुजाभाव सुरू आहे. मला राजकारणावर बोलायचं नाही. मला आमच्या आमदाराबाबतही काही बोलायचं नाही, असंही ते म्हणाले. (vijay shivtare on remdesivir shortage in purandar)

 

संबंधित बातम्या:

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

Coronavirus: देशातील परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत एका आठवड्याचा कर्फ्यू

रुग्णांना त्रास दिला तर खैर नाही; महापौर पेडणेकर वॉर रुममधील कर्मचाऱ्यांवर भडकल्या

(vijay shivtare on remdesivir shortage in purandar)