AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्साहात ते मतदानासाठी आले…मतदान केले..अन् केंद्रावरच आला ह्रदयविकाराचा झटका

Gram Panchayat Election 2023 Voting | राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. यावेळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून येत आहे. काही ठिकाणी मतदानावरुन वादही निर्माण होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर एक दुर्देवी घटना घडली. मतदानासाठी आलेल्या मतदारास ह्रदयविकाराचा झटका आला.

उत्साहात ते मतदानासाठी आले...मतदान केले..अन् केंद्रावरच आला ह्रदयविकाराचा झटका
Sunil Gandhi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 05, 2023 | 2:42 PM
Share

कुणाल जयकर, अहमदनगर | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. गावपातळीवरील निवडणूक असल्यामुळे मतदारांचा चांगला उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक मत महत्वाचे आहे. यामुळे सर्वच मतदारांना आणण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. ग्रामीण भागात शेतात जाण्यापूर्वी अनेक जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा होत्या. दुपारी काही ठिकाणी रांगा कमी झाल्या. अहमदनगर जिल्ह्यातील करंजी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. या ठिकाणी मतदान केंद्रावर एक दुर्देवी घटना घडली. मतदानासाठी आलेल्या मतदारास ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे मतदान केंद्रावर गंभीर वातावरण निर्माण झाले.

नेमका काय घडला प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील 1 हजार 697 सदस्यपदासाठी मतदान होत आहे. 175 ठिकाणी सरपंचपदाची थेट निवडणूक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पार्थर्डी तालक्यातील करंजी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी सातवाजेपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी सुनिल गांधी हे मतदानासाठी आले होते. मतदान करुन ते मतदान कक्षाच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे मतदान केंद्रावर धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालायत नेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून होते आजारी

सुनील गांधी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु गावातील मतदान असल्यामुळे ते मतदानासाठी आले. मतदान करेपर्यंत त्यांना काहीच त्रास झाला नाही. मतदान करुन आल्यानंतर त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली. पाथर्डी करंजी ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी महत्वाची आहे. निवडणुकीचा निकाल सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यात कोणता गट बाजी मारणार? हे स्पष्ट होईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?