
घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी..! आई.. कुठेही असली तरी आपली मुलं, बाळं सुखरूप आहेत ना याकडेच तिचं नेहमी लक्ष असतं. पण काही वेळा असं काही घडतं की नात्यांवरचा, प्रेमावरचा विश्वास उडेल की काय, त्याला तडा जाईल की असं वाटावं अशी परिस्थिती समोर येते. आई म्हणून हाक मारायला भीती वाटावी अशी एक अत्यंत भयानक घटना गजबजलेल्या पुण्यात घडली आहे. पुण्यातील वाघोलीत एक हत्याकांड झालंय. आणि तो हल्ला केला आहे चक्क एका आीन.. तोही आपल्याच पोटच्या गोळ्यांवर, तिच्याच मुलांवर…
हो , वर लिहीलेलं अक्षर अन् अक्षर खरं आहे, पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोडवर एका महिलेने तिच्या दोन मुलांवर हल्ला (Pune Crime) केला. 11 वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला तर 13 वर्षांची तिची मुलगी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर असून जगण्यासाठी झुंज देत आहे. सोनी संतोष जायभाय असे हल्लेखोर महिलेचे, त्या आईचं नाव असून पोलिसांनी तिला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सुसंस्कृत, सुशिक्षितांचं शहर म्हणून नावलौकिक असलेलं पुणं प्रचंड हादरलं असून परिसरातील नागरिकही दहशतीत आहेत.
मुलाचा गळा चिरला, मुलीवरही केले सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिहाल सोनी संतोष जायभाय ही मूळची पुण्याची नाही. ती नांदेडच्या कंधार येथील रहिवासी असून काही काळापासून पुण्यातल्या बाईफ रोडवरच्या एका इमारतीत तिच्या कुटुंबासह राहते. या घटनेत तिचा 11 वर्षांचा मुलगा साईराज याचा मृत्यू झाला. तर त्याची मोठी बहीण,13 वर्षांची धनश्री ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोनी यांच्या घरात घडलेल्या हत्याकांडानंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण घरात, पांढऱ्या शुभ्र फरशीवर रक्ताचा सडा पडेलला होता. 11 वर्षांचा मुलगा मृतावस्थेत जमिनीवर होता, तर मुलगी गंभीर जखमी होती. सोनी यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली, तर मुलगी धनश्री हिच्यावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले पण समोरचं दृश्य पाहू दारातच थबकले. कोणीतरीह पोलिसांन कळवल्यावर, पोलिसांचं पथक घटनास्थी आलं, त्यांनी जखमी मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवल. तर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
मुलांवर का केला हल्ला ?
मुलांवर हल्ला करणाऱ्या सोनीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिने नेमकं हे कृत्य का केलं, आपल्याच मुलाला का मारलं, मुलीवर प्राणघातक हल्ला का केला ? याचं कारण अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे असून भयानक हत्येच कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या गुन्हेगारी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे . निष्पाप मुलाच्या हत्येमुळे आणि मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.