Pune Rain | आनंदाची बातमी: मान्सून पुण्यात दाखल

मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. | Monsoon Rain Pune

Pune Rain | आनंदाची बातमी: मान्सून पुण्यात दाखल
प्रतिकात्मक फोटो

पुणे: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस अखेर पुण्यात दाखल झाला आहे. मान्सूनचा पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून (Monsoon) राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. (Monsoon Rain in Pune)

राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सांगलीत खरीप हंगामाची तयारी सुरु

मान्सून दाखल होण्याची चाहूल आणि तोक्ते चक्रिवादळामुळे पाऊस पडल्याने घातीला आलेल्या शिवारात खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सांगली जिल्ह्यात सुरू आहे. तर, इंधन दरवाढीमुळे बैलजोडीच्या मेहनतीकडे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

संबंधित बातम्या:

Raining In Winter | हिवाळ्यात पाऊस का पडतो? जाणून घ्या

Monsoon Updates : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल

(Monsoon Rain in Pune)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI