AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Updates : अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट, पुणे, मुंबईत काय असणार परिस्थिती

Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. पाऊस आता अनेक ठिकाणी जोर धरत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे. देशात जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे.

IMD Weather Updates : अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट, पुणे, मुंबईत काय असणार परिस्थिती
| Updated on: Jul 07, 2023 | 11:01 AM
Share

पुणे : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईला यलो अलर्ट दिले तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्याचवेळी केरळमध्ये १ ते ६ जून दरम्यान १०६ टक्के पाऊस झाल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये 129 मिमी पावसाऐवजी 266 मिमी पाऊस या आठवड्यात झाला आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार जलधारा कोसळत आहेत. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यास अलर्ट

आयएमडीने मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वासिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. त्याचवेळी सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज् अलर्ट दिला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस

नाशिकमध्ये पुढचे 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पात 26 टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत 5 टक्के अधिक साठा आहे. जुलै महिन्यामध्ये सरासरी इतका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही. गंगापूर धरणातही ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. आता पावसाने चांगला जोर धरल्यास पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शेती कामांना वेग आला आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. सध्या होत असलेला पाऊस शेतीसाठी पूरक आहे.

बुलढाण्यात जोरदार पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून धो धो पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतांना सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. वाशिम जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या दमदार पावसानंतर आता पेरण्यांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग मिळणार आहे. कल्याण डोंबिवलीत परिसरात गुरुवारीरात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. या पाऊसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....