AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल

राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या 12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय.

विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Updated on: May 21, 2021 | 8:57 PM
Share

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या 12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांनाच प्रश्न केल्यानं याबाबत आता हालचाल होण्याची शक्यता निर्माण झालीय. (Mumbai High Court question to the Secretary of Governor Bhagatsingh Koshyari)

6 नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्य पदासाठी 12 नावांची शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांकडून त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणात नाशिकच्या रतन सोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस 6 नोव्हेंबर 2020 ला केली असताना त्याबाबत अद्याप का निर्णय घेतला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय.

विधिमंडळ समित्यांबाबत पेच निर्माण होईल – पटोले

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या या संवैधानिक की असंवैधानिक आहेत, हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. विधिमंडळ कामकाजासाठी आपल्या सहीनं एकूण 16 कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांमध्ये राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. जर या जागा रिक्त असतील तर त्या क्षेत्राच्या लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे या सर्व कमिट्या असंवैधानिक ठरु शकतात. जर कामकाज संवैधानिक नसेल तर या सर्व कमिट्या सरकारला रद्द कराव्या लागतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली होती. त्यामुळे राज्य सरकारसमोर आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी

कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

संबंधित बातम्या :

नवाब मलिक आमच्या बुटांबद्दल बोलतात, पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील, दरेकरांचा हल्ला

‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं’, नाना पटोलेंचा जोरदार टोला

Mumbai High Court question to the Secretary of Governor Bhagatsingh Koshyari

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.