AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं’, नाना पटोलेंचा जोरदार टोला

देशाला स्मशान केलं आणि आज ते भाऊक होत असतील यावर विश्वास बसत नाही', असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणलाय.

'मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं', नाना पटोलेंचा जोरदार टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
| Updated on: May 21, 2021 | 6:20 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिसरी लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला आहे. दरम्यान, ‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं. देशाला स्मशान केलं आणि आज ते भाऊक होत असतील यावर विश्वास बसत नाही’, असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणलाय. (Nana Patole criticizes PM Modi and Devendra Fadnavis)

पंतप्रधान मोदींची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी अश्रू ढाळत असतील तर जनता मान्य करणार नाही. बनारस मॉडेलमध्ये गंगेत मृतदेह वाहत आहेत. त्यांचं ते स्वप्न असेल तर त्यांना कळायला हवं की कुत्र्या-मांजरासारखं लोकांना मरायला सोडलंय. त्यांचा हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी मोदींवर केलीय.

‘ही वेळ राजकारणाची नाही’

कोकणात चक्रीवादळानं मोठं नुकसान झालंय. ही वेळ राजकारणाची नाही तर लोकांना मदत करण्याची आहे. विरोधी पक्षाने राजकारण करु नये नाहीतर लोकांना मदत मिळणार नाही. एनडीआरएफच्या माध्यमातून केंद्रानं मदत करावी. केंद्र काही उपकार करत नाही, हे घटनात्मक आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे स्वत:च आत्मघातकी राहिलंय, असंही पटोले म्हणाले.

‘विनायक मेटेंना पुढे करुन जर खेळ सुरु’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, विनायक मेटे यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. ते कुठेही जाऊ शकतात. फक्त मोदींविरोधात कुणी काही बोलू शकत नाही. देशातील जनतेकडून त्यांनी हा हक्क हिरावून घेतलाय, असा टोला पटोलेंनी लगावलाय. फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा प्रकरण हायकोर्टातून सुप्रिम कोर्टात गेलं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. सुप्रिम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही भाजप विनायक मेटेंना पुढे करुन जर खेळ करत असेल तर हे चुकीचं आहे, असंही पटोले म्हणाले.

‘छत्रपती संभाजी यांच्याबद्दल बोलायचं नाही’

छत्रपती संभाजी यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. ते आरक्षणाचा विरोध करणारे होते. छत्रपती शाहूंनी आरक्षणाचं अस्त्र दिलं. ज्याने मागास वर्गाचा विकास झाला. आधी त्यांनी सांगितलं की आरक्षण नको पण आता त्यांचीही भूमिका बदलली आहे. ते भाजपचे खासदार आहेत. त्यांनी कोण असली आणि कोण नकली हे ओळखावं, असं आम्हाला त्यांना सुचवायचं असल्याचंही टोपे म्हणाले. त्याचबरोबर खते आणि इंधन दरवाढीविरोधात आमची मोहीम सुरु झालीय. सोमवारपासून आम्ही आंदोलन करु. खतांबद्दल, पेट्रोल-डिझेलबद्दल आंदोलन करु. घंटा वाजवून झोपलेल्या मोदी सरकारला जागं करणार असल्याचंही यावेळी टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली, डॉक्टरांसोबत बोलताना पंतप्रधान मोदींना हुंदका दाटला

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

Nana Patole criticizes PM Modi and Devendra Fadnavis

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.