हाय सिक्योरिटी, अंगात भगवी शाल, राहुल गांधी ‘हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान’, पुण्यातील Video, बॅनरची एकच चर्चा!
Rahul Gandhi Saffron Shawl : पुण्यातील कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भगवी शाल टाकत स्वागत केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भगवी शाल टाकत स्वागत केले. तसेच पुण्यात राहुल गांधी हे हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान असे बॅनरही पहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पुणे विमानतळावर नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
गळ्यात भगवी शाल घालून राहुल गांधींचे स्वागत
पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी हजर होते. राहुल गांधी विमानतळावरून बाहेर पडताच काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच एका महिला पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांच्या गळात भगवी शाल घातली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या गळ्यात भगवी शाल घालतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रेटून बोल पण खोटं बोल ही भाजपाची नीती – मोहन जोशी
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नाना पटोले, काँग्रेसचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेसमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रेटून बोल पण खोटं बोल की भाजपाची नीती आहे.
कार्यक्रमाला विद्यार्थी गर्दी करतील – जोशी
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस पैसे देऊन त्यांनी मुलं आणली. त्यामुळे त्यांना तसेच वाटते की पुण्यामध्ये पण पैसे देऊन मुलं आणली असतील. पण स्वेच्छेने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी गर्दी करतील. सावित्रीच्या लेकी ठरवून देतील की आमचा नेता राहुल गांधी आहे. भाजपात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाने आपापल्या विधानसभेमध्ये वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम ठेवलेले आहेत मात्र याला न जुमानता अनेक विद्यार्थिनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.