रायगडावर किल्ल्याबाहेरील तिकीटघराचा शिवप्रेमींकडून ‘कडेलोट’, कारणं काय?

| Updated on: Feb 02, 2021 | 10:14 PM

रायगड किल्ल्याबाहेर काही शिवप्रेमींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. (Raigad Fort ticket office Vandalism by Devotees)

रायगडावर किल्ल्याबाहेरील तिकीटघराचा शिवप्रेमींकडून कडेलोट, कारणं काय?
Follow us on

रायगड : महाराष्ट्रातील महाड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याबाहेर काही शिवप्रेमींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रायगडावर पुरातत्व विभागानं बसवलेली तिकीट घर शिवप्रेमींनी हटवून ती बंद पाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी तिकीटाच्या नावे लूट करण्यात येत होती. यामुळेच शिवप्रेमींनी या तिकीट घराची तोडफोड केली आहे. (Raigad Fort ticket office Vandalism by Devotees)

कारणं काय?

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजा येथे केंद्रीय पुरातत्व विभागाने तिकिट घर उभारले होते. हे तिकिट घर येथे पार्किंगमधील मोठ्ठया गाड्यांच्या वळणासाठी त्रासदायक बनले होते. तसेच पूर्वी या तिकीटाचे दर 10 रुपये होते. मात्र आता ते दर 25 रुपये करण्यात आले होते. यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिकांना हे दर परवडत नव्हते. तसेच किल्ल्यावर दही, काकडी, वेफर्स अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या लोकांनाही पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असतं.

इतकचं नव्हे तर पैसे घेऊनही कोणत्याच सुविधा दिल्या जात नव्हता. मात्र सर्रास पुरातत्व खाते तिकीटाच्यारुपाने पैशाची वसूली करत होते. यामुळे चित्त दरवाजा येथील पायऱ्यांचे विदरुपीकरण झाले असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे होते. याबाबत शिवप्रेमी आणि शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता.

यानंतर सोमवारी संध्याकाळी जोरदार घोषणाबाजी करीत शिवप्रेमी चित्त दरवाजाजवळ पोहोचले. यानंतर यातील काही शिवप्रेमींनी या तिकीट घराची तोडफोड केली. किल्ले रायगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींना पैसे मोजावे लागतात, अशी नाराजी शिवप्रेमींनी व्यक्त केली होती. या ठिकाणी पुन्हा तिकीट घर लागणार नाही, असा सज्जड दमही महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला आहे.

गुन्हा दाखल

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या तिकीट घराच्या तोडफोड प्रकरणी अज्ञाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी अविराज पवार यांनी तीस ते चाळीत अज्ञात व्यक्तींविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड कलम 143, 186, 426, जमाव बंदी कलन 143, सरकारी कामात अडथळा अणल्या प्रकरणी कलम 186, आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 426 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाड तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Raigad Fort ticket office Vandalism by Devotees)

संबंधित बातम्या :

मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?

पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात