AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Landslide | मुसळधार पाऊस, प्रचंड अंधार, आणि हाहा:कार, मंत्री गिरीश महाजन यांनी बचावकार्याचा थरार सांगितला

इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे मदतीसाठी भल्या पहाटे घटनास्थळी पोहोचले होते. ते रात्रभर मदतकार्यासाठी मेहनत घेत होते. या दरम्यान त्यांनी मदतकार्यात काय-काय अडचणी आल्या, या विषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.

Raigad Landslide | मुसळधार पाऊस, प्रचंड अंधार, आणि हाहा:कार, मंत्री गिरीश महाजन यांनी बचावकार्याचा थरार सांगितला
| Edited By: | Updated on: Jul 20, 2023 | 10:43 PM
Share

रायगड | 20 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील इर्साळवाडी हे गाव दरड कोसळल्यामुळे अक्षरश: उद्ध्वस्त झालंय. संबंधित दुर्घटना घडल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी मदतकार्यासाठी रवाना झाले. गिरीश महाजन ज्यावेळी मदतीसाठी रवाना झाले त्यावेळी परिसरात प्रचंड पाऊस पडत होता. गिरीश महाजन यांनी मदतकार्यात काय-काय अडचणी आल्या, या विषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी आपला अनुभव सांगितला. “सर्वत्र अंधार. पाऊस सुरूच होता. वरुन जोरात वाराही वाहत होता. कुठल्याही यंत्राची मदत घेता येत नव्हती. त्यामुळे माणसांच्याच मदतीने बचावकार्य सुरू होते”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. गिरीश महाजन यांनी प्रेसनोटच्या माध्यमातून आपलं मनोगत मांडलं आहे.

इर्सळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्साळवाडी गावात दरड कोसळल्याचे समजताच महाजन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले होते. रात्री तीन वाजेच्या दरम्यान ते इर्साळवाडीला पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी हेदेखील होते. मदतकार्यातील अडथळे सांगताना महाजन म्हणाले, “अंधार असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्‍थळ गाठले. खाली पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. सीओ, पोलीस अधिक्षक, एसडीओ, तहसीलदार आदी अधिकारी आणि कर्मचारीही होते. तुफान पाऊस कोसळत होता. सोबत जोराचा वाराही होता. सर्वत्र अंधराचेच साम्राज्य होते.”

गिरीश महाजन यांनी सांगितला थरार

“डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याचा रस्ता केवळ 3 फुटाचा. बाजूला खोल दरी, जोराचा वारा आणि वरुन पाऊस. पायी चालणेही कठीण जात होते. अचानक कुठे दरड कोसळेल याचा नेम नव्हता. निघत असतानाच पोलिसांनी धोक्याची सूचना दिली. अचानकपणे कधीही दरड कोसळू शकते असा इशाराही दिला. जवळच्या गावांमधून 50 ते 60 गावकऱ्यांची टीम मदतीकरीता जमवली. तोपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

‘जेवढा मलबा उपसत होतो त्यापेक्षा जास्त मलाबा जमा होत होता’

“एनडीआरएफची टीम आमच्या मदतीसाठी पोहोचली होती. डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. खराब हवामान आणि लँडीगकरिता जागा नसल्यामुळे हेलीकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, बचावकार्य सुरु केले. मातीचा मलबा उपसण्याच्या कामी सर्वजण लागले. पाऊस सुरूच होता. त्यामुळे जेवढा मलबा उपसत होतो त्यापेक्षा जास्त मलाबा वरुन पुन्हा जमा होत होता”, असं गिरीश महाजनांनी सांगितलं.

‘मदतकार्यात खूप अडचणी’

“वाटही निसरडी झाल्याने मदतकार्य करणारे घसरुन पडत होते. सगळी परिस्थिती हाता बाहेरची होती. साधारणत: 250 लोक वस्तीचा हा पाडा. 60 ते 70 व्यक्ती रोजगारासाठी पाड्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुदैवाने ते या दुर्घटनेतून बचावले. सकाळपर्यंत आजुबाजुच्या गावांतील गावकरी घटनास्थळी जमली. त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकजण आप्त-स्वकीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. हे लिहीपर्यंत सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले होते”, अशी माहिती महाजन यांनी दिली.

‘एकाच ठिकाणी दफन’

“बचावकार्य सुरु असताना दुर्दैवाने नऊ जणांचे मृतदेह हाती लागले. दफनविधी करण्याचे ठरल्यानंतर खड्डे खोदण्यात आले. पाऊस सुरु असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो. या कठीण प्रसंगात काळजावर दगड ठेवून ते मृतदेह दफन केले”, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

‘अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू’

“डोंगरावर चढत असताना खुप दम लागत होता. आमच्या मागेच शंभर दोनशे फुटावर आमच्या सोबतचा अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यास हृदय विकाराचा झटका आला असावा. यातच दुर्दैवाने त्याला प्राण गमवावे लागले”, असे महाजन यांनी सांगितले.

‘शाळेत झोपलेली सहा मुले सुरक्षित’

“गावातील शाळेच्या इमारतीमध्ये गावातील 6 मुले झोपलेली होती. सुदैवाने ती या दुर्घटनेमधून सुरक्षित राहू शकली. दरड कोसळण्याच्या आवाजामुळे जागे होऊन या मुलांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जवळच्या लोकांना कळवले. त्यामुळे मदतीसाठी अनेकजण धावून आले”, अशी माहिती महाजन यांनी दिली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.