AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाला रायगडमध्ये मोठं खिंडार, बडा नेता पक्षाकडे पाठ फिरवणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या गोटातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटाला रायगड जिल्ह्यात मोठं खिंडार पडणार आहे. कारण त्यांच्या पक्षाचा एक बडा नेता आणि माजी आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहे. विशेष म्हणजे हा नेता अजित पवार यांच्या गटातही जाणार नाही. हा नेता एका बड्या सत्ताधारी पक्षात सहभागी होणार आहे.

शरद पवार गटाला रायगडमध्ये मोठं खिंडार, बडा नेता पक्षाकडे पाठ फिरवणार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 08, 2023 | 8:09 PM
Share

रायगड | 8 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला रायगडमध्ये मोठं भगदाड पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण पडद्यामागे सध्या तशा घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडींचा एक भाग म्हणून प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी पावलं टाकत आहे. त्यासाठी इतर पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांना आपल्या पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण त्यांच्या पक्षाचे रायगड जिल्ह्यातील माजी आमदार आता थेट भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांमध्ये अनपेक्षित घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. अजित पवार यांच्या गटात सर्वाधिक आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या गटात मोजकेच आमदार आहेत. असं असताना आता शरद पवार गटातील एक माजी आमदार कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीला कर्जतमध्ये मोठं खिंडार पडणार

सुरेश लाड हे शरद पवार यांच्या गटात होते. खरंतर सुरेश लाड आणि अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. पण नंतर त्यांच्यात राजकीय मतभेद झाले. त्यामुळे सुरेश लाड हे शरद पवार गटात होते. त्यानंतर त्यांनी आता भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय शरद पवार गटासाठी धोकादायक ठरु शकतो. कारण त्यांच्यासह कर्जतचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शरद पवार गटाला कर्जतमध्ये मोठं खिंडार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?