AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातील प्रवासी गाडीवर दरोडा, इतके तोळे सोने लुटले; पाच जणांना रॉडने मारहाण

पेनला असलेल्या साई सहारा हॉटेलजवळ आल्टिका गाडीत असलेल्या मुलांनी गाडीवर दगडफेक केली. दोनशे मीटरवर गाडी थांबवून दगड का मारले म्हणून विचारना केली. तेवढ्यात तिथं आणखी दोन कार आल्या.

कोकणातील प्रवासी गाडीवर दरोडा, इतके तोळे सोने लुटले; पाच जणांना रॉडने मारहाण
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 3:04 PM
Share

रायगड : रायगड हद्दीत प्रवाश्यांच्या गाडीवर दरोडा पडूनही पनवेलपर्यंत मदत मिळाली नाही. नवी मुंबई पोलिसांनी विनासंरक्षण पुन्हा पेनला पाठविले. मुंबई-गोवा हायवेवर कोकणातील प्रवाश्यांचा गाडीवर रात्री 2.30 च्या सुमारास हल्ला व दरोडा पडला. चार-पाच जणांना रॉड, स्टंपने मारहाण केली. तसेच 15 तोळे सोने लुटून आरोपींनी पोबारा केल्याची घटना घडली. रात्री 3 च्या सुमारास मुंबई-गोवा हायवेवर पेनजवळ हॉटेल मीलन पॅलेससमोर हा प्रकार घडला. भीतीच्या आकांताने दापोलीतील कुटुंबीयांनी कसे-बसे पनवेल एसटी बस स्थानक गाठून आसरा घेतला.

तीन कारमधून उतरले आरोपी

पनवेलमधून पोलीस कंट्रोल रूम 100 नंबरवर मदत मागितली. त्यानंतर पोलिसांची मदत पोहचली. त्यानंतर नवी मंबई पोलिसांनी कुठलाही बंदोबस्त केला नाही. तक्रारदारांना असुरक्षित वाटत असताना स्वतः पेनला पाठवले. घाबरत घाबरत तक्रारदार पेनमधील हमरापूर फाट्यापर्यंत पोहचले. सर्व आरोपी 3 कारमध्ये होते. स्विफ्ट, वेंटो, एर्टिगा मध्ये 15 पेक्षा जास्त आरोपी होते.

कारवर दगडफेक केली

यापैकी राजस्थान पासिंग स्विफ्ट कार घटना स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतली. तर अन्य दोन कारने आरोपी नवी मुंबई दिशेला पळून जाण्यात यशस्वी झाले. पुढील कारवाई दादर सागरी पोलीस स्टेशन करीत आहे. प्रशांत मोहिते म्हणाले, दापोलीपासून प्रवास करत होतो. पेनला असलेल्या साई सहारा हॉटेलजवळ आल्टिका गाडीत असलेल्या मुलांनी गाडीवर दगडफेक केली. दोनशे मीटरवर गाडी थांबवून दगड का मारले म्हणून विचारना केली. तेवढ्यात तिथं आणखी दोन कार आल्या.

सोन्याचे दागिने लुटून नेले

तिथून तीस-बत्तीस मुलं बाहेर आली. त्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात माझा भाऊ आणि मी जखमी झालो. माझ्या बहिणीलासुद्धा त्यांनी मारहाण केली. आमच्या गड्यातील सोनं खेचून ते पळून गेले. घटनास्थळी एक गाडी राहिली होती ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली.

पोलीस घटनास्थळी आले. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. आमच्याकुटुंबीयांकडून १५ तोड्यांच्या सोन्याची लूट केली आहे.शिवाय आम्हाला मारहाण करण्यात आली आहे. तीन गाड्या होत्या. त्यापैकी स्वीफ्टचा नंबर राजस्थान पासिंगचा दिसला. दुसरी लाल रंगाची स्कोडा गाडी होती.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.