रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 44 हजारांपर्यंत पगार, आताच करा अर्ज, शेवटची तारीख…

रेल्वे भरती बोर्डाकडून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मिळणार 44 हजार रुपयांपर्यंत पगार. ही आहे शेवटची तारीख.

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 44 हजारांपर्यंत पगार, आताच करा अर्ज, शेवटची तारीख...
| Updated on: Jan 10, 2026 | 5:37 PM

Railway Jobs 2026 : जर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्यामुळे तुमचं रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून आइसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. या भरतीत ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर यांसह अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे जे तरुण नोकरी शोधत आहेत ते 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

RRB कडून जाहीर करण्यात आलेल्या या भरतीमध्ये सर्वाधिक 202 पदे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी राखीव आहेत. याशिवाय चीफ लॉ असिस्टंटसाठी 22, पब्लिक प्रॉसिक्यूशन 7, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टर 15 आणि स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर पदासाठी 24 जागा आहेत. तांत्रिक व वैज्ञानिक श्रेणीत सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग) 2, लॅब असिस्टंट ग्रेड-3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) 39 आणि सायंटिफिक सुपरवायझर पदासाठी 1 जागा असणार आहे.

काय असेल शैक्षणिक पात्रता?

या भरतीसाठी प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे. चीफ लॉ असिस्टंट व पब्लिक प्रॉसिक्यूशन पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी LLB अनिवार्य आहे. तर सायंटिफिक व तांत्रिक पदांसाठी विज्ञान विषयातील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.

त्यासोबत वयाची देखील मर्यादा असणार आहे. ज्यामध्ये उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असणे बंधनकारक आहे. कमाल वयोमर्यादा पदानुसार 30 ते 40 वर्षांदरम्यान ठेवण्यात आली आहे. एससी, एसटी, ओबीसी व अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

पगार आणि सुविधा

या भरतीमध्ये ज्यांची निवड होईल त्यांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. यामध्ये अनेक पदांसाठी 35,400 रुपये दर महिना, तर चीफ लॉ असिस्टंटसारख्या वरिष्ठ पदांसाठी 44,900 रुपये दर महिना पगार मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता व अन्य शासकीय सुविधा मिळणार आहेत.

यामध्ये जनरल, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये तर एससी व एसटी उमेदवारांसाठी 250 रुपये ठेवण्यात आले आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.