पावसाचा हाहाकार! शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी, नागरिकांना..

Rain Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शाळांना सुट्टी जाहीर केली. नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला.

पावसाचा हाहाकार! शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी, नागरिकांना..
Rain Update
| Updated on: Jul 04, 2026 | 7:47 AM

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. पावसाचा जोर वाढत असून आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले. यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला. कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. सीएमओकडूनही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. जून महिना कोरडा गेला असला तरीही जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी शुक्रवारी चांगला जोर धरला सकाळपासूनच पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस झाला. आंबेडकर रोड पाण्याखाली गेला असून रस्त्याला जलमय स्वरूप प्राप्त झाले. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला.
सखल भागांसह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा जोर सकाळी वाढताना दिसतंय. मुंबईच्या काही सखळ भागात पाणी साचण्यास सुरूवात झाल्याचे बघायला मिळतंय.
4 ते 5 दिवसात विक्रमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. आज जवळपास ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आला. कुठे रेड, ऑरेंज जारी करण्यात आला. गुजरात ते आग्रेय अरबी समुद्रात हवेता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Follow Us