
राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर असून राजकारण प्रचंड तापले आहे. पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत महापालिकेच्या निवडणुका लढत आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन मुंबई महापालिकेवर फक्त आणि फक्त मराठी माणूसच महापाैर होईल आणि तोही आमच्याच पक्षाचा असा दावा केला जातोय. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा ही फक्त मुंबई महापालिकेची सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेवर सत्ता सर्वच राजकीय पक्षांना हवीये. मुंबई महाराष्ट्रपासून तोडली जात असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. नुकताच दोन्ही उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येत त्यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली.
महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यासोबतच भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाची एक्सपायरी डेट आहे, म्हणत ठाकरे बंधूंनी अत्यंत मोठा इशारा दिला. ठाकरे बंधुनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रपासून कोणीही तोडू शकत नसल्याचे म्हटले. पण त्यांच्याच हातात काही नाही. त्याची इच्छा चांगली आहे. पण जे वरून म्हणजे दिल्लीतून सांगतील तेच त्यांना ऐकावे लागेल. वरंच्यांच्या मनात काय आहे हे महत्वाचे आहे.
आम्ही म्हणतोय की, मुंबईचा महापाैर हा मराठीच होणार… पण भाजपा म्हणतेय की, मुंबईचा महापाैर हिंदूंच होणार… मग ते मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत का? उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मनमोहन सिंग हे मुंबईला आर्थिक केंद्र देणार होते, तेही मोदी, शहा यांनी गुजरातला नेले. यादरम्यान संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना विचारले की, मधल्या काळात तुम्ही एक विधान केले, ज्यामध्ये तुम्ही म्हटले की, भाजपला मोदींची आणि पैशांची मस्ती आहे..
यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, हो त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण सगळे पत्त्यांचा बंगला करत. त्यांच्याकडे सुद्ध पत्त्यांचा बंगला आहे. पण तो उलट आहे. आता हे सर्वकाही बोलतात ते फक्त मोदींच्या जीवावर बोलतात. भारतीय जनता पक्षाला आज ते मतदान होतोय ते मोदींमुळे. पण भाजपाची एक्सपायरी डेट असल्याचा उल्लेख करण्यात आला.