देशाचे गृहमंत्री ठणकावून सांगतात, मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे, मग आम्ही…राज ठाकरेंची जोरदार टीका

देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड प्रकल्प गेला. प्रत्येक व्यक्तीला राज्याबद्दल प्रेम असतं, म्हणत राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

देशाचे गृहमंत्री ठणकावून सांगतात, मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे, मग आम्ही...राज ठाकरेंची जोरदार टीका
Raj Thackeray Amit Shah
| Updated on: Aug 02, 2025 | 1:32 PM

पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित लावली. यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना राज ठाकरे हे दिसले. मराठी आणि गुजराती अशी भांडणे लावण्याचा उद्योग सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. राज ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे शिक्षणमंत्री दादा भुसे आले होते. हिंदीच्या प्रश्नावर बोलायला. मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो. पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहे. अमित शाह बोलले की मी हिंदी भाषिक नाही. मी गुजराती आहे.

मी हिंदी भाषिक नाही गुजराती आहे गृहमंत्र्यांनी ठणकावून सांगितले 

देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड प्रकल्प गेला. प्रत्येक व्यक्तीला राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलल्यावर संकुचित कसे होतो? मी जेव्हा म्हटलं गुजरातला आहे का हिंदी. ते म्हणाले, नाही. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणता? यांचं राजकारण काय चाललंय हे समजून घ्या. एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठिवर तुम्हाला काहीच स्थान नाही.

राज ठाकरे आणि दादा भुसेंच्या भेटीत काय घडलं? 

गुजरातमधून बिहारी लोकांना हकलून दिलंय. हेच नाही तर पहिल्यावेळी 20 हजार बिहारी लोकांना गुजरातीमधून हाकलून देण्यात आली. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांच्या भेटीला दादा भुसे हे पोहोचले होते. या दोघांच्या भेटीनंतर काही तोडगा हा निघू शकला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान दादा भुसेंसोबतच्या भेटीत काय घडले हे स्पष्ट सांगितले.

आम्ही बोलल्यावर संकुचित कसे होतो?- राज ठाकरे 

गुजरातमध्ये हिंदी सक्ती शालेय शिक्षणात आहे का हो? असा प्रश्न राज ठाकरेंनी दादा भुसेंना विचारला होता. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा जीआर सरकारला मोठ्या विरोधानंतर रद्द करावा लागला. गुजरातमध्ये एक कायदा असून गुजरातच्या बाहेरील व्यक्तीला तिथे जमिन विकत घेता येत नसल्याचे सांगताना राज ठाकरे दिसले. राज ठाकरे यांनी त्यांच्या या भाषणातून भाजपावर, जोरदार टीका केल्याचे बघायला मिळतंय.