तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर; राज ठाकरेंनी चांगलच फटकारलं
विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे.

त्रिभाषा धोरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला. आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.
‘मराठी हाच अजेंडा’
‘कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी. खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही’, असे राज ठाकरे म्हणाले.
“आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर”
पुढे ते म्हणाले, ‘आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. एक पत्र लिहिलं. दोन पत्र लिहिली. नंतर दादा भुसे आले. भुसेंना म्हटलं ऐकून घेईल. पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आले. ते आलं ते केंद्र सरकार. राज्य आणि केंद्र सरकारच्या दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आलं. कोर्टात इंग्रजीतच काम होतं. कुठे आहे त्रिभाषा सूत्र. इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी.’
दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाही यांना. पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं आणि काय होतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय़ होता. भूसेंना सांगतिलं. यूपी, मध्यप्रदेश, राजस्थानात कोणती तिसरी भाषा आणणार आहात. खरंतर आणली पाहिजे. गंमत पाहा. हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास. हिंदी न बोलणारी राज्य आऱ्थिक दृष्ट्या प्रगत आहेत आणि वर हिंदी शिकायची आम्ही. हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आलं नाही. रोजगाराला इकडे येतात. आम्ही आम्ही हिंदी शिकायचं. पाचवी नंतर मुलं काय हिंदी चित्रपट सृष्टीत जाणार का? आमचा भाषेला विरोध नाही. एक भाषा, एक लिपी उभी करायला वर्ष लागेल असे राज ठाकरे म्हणाले.