
Raj Thackeray: तुम्ही मतदान करा अथवा नका करु रिझल्ट आधी ठरलेला आहे… महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. विरोधकांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे म्हणून तुम्हाला राग येतोय. ही सत्ता कशी आली, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे… कशी सत्ता आणली जात आहे… राजकारण कसं सुरु आहे… आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदान यादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा मुंबईत सुरु आहे. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विधानसभेत 232 आमदार निवडून आलीत, पण महाराष्ट्रात सर्वत्र सन्नाटा होता. कुठे विजयी मिरवणुका नाहीत… जल्लोष नाही… काहीच नाही… तेव्हा मतदार तर अवाक् झालेच होते, तर जे निवडून आले ते देखील अवाक् झाले होते… त्यांना देखील कळलं नाही, ते कसे निवडून आले… त्यानंतर देशात कशा प्रकारच्या निवडणुका सुरु आहेत, याबद्दल सर्वांना कळलं. अनेक जण म्हणतात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, पण ते निवडून येत नाही… निवडणुका अशा होत असतील, तर कसं निवडून येणार असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला..
राज्यातील जे स्थानिक पक्ष आहेत, त्यांना संपवण्याचं काम सुरु आहे… मॅच फिक्स झालेली आहे… ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे…. असं देखील राज ठाकरे म्हणाले. मतदार याद्यात तुमची गणितं सगळी सेट केली असेल तर आमचा आमदार खासदार कसा निवडून येईल.
तुम्ही मतदान करा अथवा नका करु रिझल्ट आधी ठरलेला आहे. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सांगतोय की या याद्या सुधारा… असं सांगितल्यानंतर सत्ताधारी पक्ष चिडत आहेत? लागते आहे का कुठे तरी… तुम्हाला राग येत आहे, कारण तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे. ही सत्ता कशी आली, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे… कशी सत्ता आणली जात आहे… राजकारण कसं सुरु आहे… खोट्या मतदार याद्यांवरुन निवडणुका होणार असेल तर, मतदारांचा अपमान आहे… असं देखील राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या ग्रँड मेळाव्याला मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.