अश्विनी बिद्रे प्रकरणाची कोर्टात सुनावणी; डीजीपी नगराळेंना सहआरोपी करण्याची पतीची पुन्हा मागणी

| Updated on: Jan 08, 2021 | 3:40 PM

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी नगराळे यांना सहआरोपी करा, अशी मागणी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे. (raju gore demand action against Maharashtra DGP Hemant Nagrale)

अश्विनी बिद्रे प्रकरणाची कोर्टात सुनावणी; डीजीपी नगराळेंना सहआरोपी करण्याची पतीची पुन्हा मागणी
Follow us on

नवी मुंबई: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे यांच्या हत्याप्रकरणाची आजपासून पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सुनावली थांबली होती. आता पुन्हा पनवेलच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. कालच डीजीपीची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज पुन्हा नाव आल्याने नगराळे पुन्हा चर्चेत आले आहेत. (raju gore demand action against Maharashtra DGP Hemant Nagrale)

कोरोनामुळे कोर्टाचं कामकाज बंद होतं. फक्त महत्त्वाच्या प्रकरणावरच सुनावणी होत होती. कोरोनामुळे बिद्रे हत्याकांडावरची सुनावणीही बंद होती. आज पहिल्यांदाच पनवेल जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. ही केस वर्षभरात संपवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे हा खटला आज दिवसभर सुरू राहणार आहे. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान हत्येच्यावेळी कुरुंदकर नेमके कुठे होते? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले गेले. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची नोंद ठेवण्यासाठी डायरी तयार करण्यात येते. त्यात कुरुंदकर हत्येच्या दिवशी नाईट राऊंडला असल्याचा उल्लेख आहे, असं कोर्टात सांगण्यात आलं. मात्र, कुरुंदकर यांनीच

यावेळी पोलीस माझे बिल देण्यात निष्काळजी पणा करत आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. मी केवळ बिलं तपास अधिकाऱ्याला द्यायच्या असतात. तपास अधिकाऱ्यांनी माझ्या हजेरीच्या नोंदी घेऊन ती द्यायची असतात. माझ्या हजेरीची खात्री झाल्यानंतर बिल देणं हे संबंधित पोलीस आयुक्तांची जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले. तसेच आपण गोवले जाऊ नये म्हणून खोटी डायरी बनवून अभय कुरुंदकर याचा स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्न होता, असं दावाही करण्यात आला आहे.

नगराळेंवर आरोप

दरम्यान, बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. नगराळे यांना वाचवण्यासाठीच त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पोलीस आयुक्तांपासून ते सर्व अधिकाऱ्यांनी हवा तसा तपास केला नाही. तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 2 वर्ष आरोपींना अटक केली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण काय?

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचं उघड झालं. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन वाशीच्या खाडीत टाकण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी कुरुंदकरसह चौघे जण तुरुंगात आहेत.

अश्विनी बिद्रे यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. (raju gore demand action against Maharashtra DGP Hemant Nagrale)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

आईप्रमाणे वडिलांचाही जीव घेतील, अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणात सरकारचा बोटचेपेपणा उघड

(raju gore demand action against Maharashtra DGP Hemant Nagrale)