विषयच खोल! कल्याणमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्याचा शेजारच्यांशी वाद, भांडण मोडण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मध्यस्थी

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले कल्याणमध्ये दयाल बहादूरे यांच्या घरी पोहचले (Ramdas Athawale meet RPI Workers at kalyan)

विषयच खोल! कल्याणमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्याचा शेजारच्यांशी वाद, भांडण मोडण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मध्यस्थी
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 12:06 AM

ठाणे : कल्याणमध्ये राहणारे आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचे शेजाऱ्यांशी वाद झाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले कल्याणमध्ये दाखल झाले. ते दयाल बहादूरे यांच्या घरी पोहचले. त्यांनी बहादूरे यांच्याघरात न्यायनिवाडा सुरु केला. आरपीआयचे पदाधिकारी आणि पोलीस आमनेसामने आले. (Ramdas Athawale meet RPI Workers at kalyan).

कल्याणचे एसीपी अनिल पवार यांनी गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी केंद्रीय मंत्री आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. “दयाल बहादूरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार ही पोलिसांवर दबाव टाकून देण्यात आली आहे. आपण एका इमारतीत राहतो. त्यामुळे एकमेकांना संभाळून घेतले पाहिजे, असा सल्ला सोसायटीतील लोकांना दिली आहे . या प्रकरणात पोलिसांना उचीत कारवाई करण्यात यावी असी सूचना केली आहे”, असं आठवले म्हणाले (Ramdas Athawale meet RPI Workers at kalyan).

“एकाच सोसायटीत राहत असताना एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. एकमेकांचा अपमान करु नये. एकमेकांना टोमणे मारु नये. दयाल बहादूर हे आमच्या रिपब्लिक पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पत्नीला सोसायटीतील मंडळींकडून टोमणे मारल्याने वाद निर्माण झाला. सोसायटीतील मंडळींकडून दयाल बहादूरे यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत एसपींना चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“दयाल बहादूरे यांच्या कुटुंबावर कोणतीही तक्रार होता कामा नये, अशी मी पोलिसांशी चर्चा केली आहे. त्यामुळे सर्व बिल्डिंगच्या लोकांना सांगणं आहे, एकमेकांचा आदर राखला पाहिजे. अनेक जाती-धर्माचे आपण एका बिल्डिंगमध्ये राहत आहोत. बिल्डिंग म्हणजे गावच आहे. जो काही प्रकार संबंधित मुलाने केलाय ते चुकीचे आहे. पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की दयाल बहादूरे यांच्या कुटुंबियांवरोधात जी चुकीची तक्रार केली गेली आहे त्याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.