अनिल देशमुख लवकर करा कोरोनावर मात, गो कोरोनाची राहिल तुम्हाला साथ, रामदास आठवलेंच्या काव्यात्मक सदिच्छा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनिल देशमुखांना काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. (Ramdas Athawale wishes recovery to Anil Deshmukh)

अनिल देशमुख लवकर करा कोरोनावर मात, गो कोरोनाची राहिल तुम्हाला साथ, रामदास आठवलेंच्या काव्यात्मक सदिच्छा
रामदास आठवले अनिल देशमुख
| Updated on: Feb 08, 2021 | 8:29 PM

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यानंतर सर्व नेत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनिल देशमुखांना हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. (Ramdas Athawale wishes speedy recovery to Anil Deshmukh Corona)

“गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात, गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ, कोरोनाने माझा केला होता पिच्छा, तेव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा, कारण तुम्ही आहात माझे चांगले मित्र, म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे शब्दचित्र,” असे ट्विट करत रामदास आठवले यांनी केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी आणखी एक ट्वीट करत अनिल देशमुखांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुखजी, आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना, कोरोना से मत हरोना। असे आणखी एक ट्विट आठवलेंनी केले आहे.

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या होत्या.

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का’ असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या होत्या. यानंतर आता आठवलेंकडूनही देशमुखांना अशाचप्रकारे काव्यात्मक अंदाजात कोरोनामुक्त होण्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या आहेत.

अनिल देशमुखांना कोरोनाची लागण 

अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. नुकतंच त्यांनी विदर्भ दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल”, असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केले होते.

(Ramdas Athawale wishes speedy recovery to Anil Deshmukh Corona)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

‘कोरोना गो’चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून ‘आठवले स्टाईल’ सदिच्छा

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तटकरेंनंतर राज्यातील अजून एका बड्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग