‘कोरोना गो’चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून ‘आठवले स्टाईल’ सदिच्छा

सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत.

'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा, गृहमंत्र्यांकडून 'आठवले स्टाईल' सदिच्छा

मुंबई : ‘गो कोरोना कोरोना गो’ असा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांनीच काळजी व्यक्त केली आहे. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. (Home Minister Anil Deshmukh wishes speedy recovery to COVID Positive Minister Ramdas Athawale)

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का’ असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रिपदाची धुरा वाहणारे रामदास आठवले रिपाइंचे अध्यक्ष आहेत. आठवले हे कुठल्याही राजकीय परिस्थितीवर कवितेतून भाष्य करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. आठवलेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये गृहमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र यामागे त्यांची खिल्ली उडवण्याचा उद्देश नसून कळकळ दिसून येते. (Home Minister Anil Deshmukh wishes speedy recovery to COVID Positive Minister Ramdas Athawale)

सध्या आठवले यांची प्रकृती ठीक आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. दोघंही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तटकरेंनंतर राज्यातील अजून एका बड्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह

देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हिरचा डोसही दिला, प्रकृतीत सुधारणा

(Home Minister Anil Deshmukh wishes speedy recovery to COVID Positive Minister Ramdas Athawale)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI