देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तटकरेंनंतर राज्यातील अजून एका बड्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग

देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यानंतर राज्यातील अजून एका मोठ्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते चार दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तटकरेंनंतर राज्यातील अजून एका बड्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे. (Central minister ramdas athavle tested corona positive)

फडणवीसांवर प्लाझ्मा थेरेपी

गेल्या चार दिवसांत राज्यातील अजून तीन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रेमडीसिव्हिरचा डोस देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. तसंच फडणवीस यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजितदादांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

अजितदादानंतर सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह

अजितदादांपाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग आहे. तटकरे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह

देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हिरचा डोसही दिला, प्रकृतीत सुधारणा

Central minister ramdas athavle tested corona positive

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *