बसायचं तर बस नाहीतर…तटकरेंच्या मेहुण्याचा रामदास कदमांकडून अपमान; भर सभेत सुनावलं!

राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर, लाडक्या बहिणींचे पैसे देताना जमवाजमव करण्याची वेळ आली असतानाही योगेश कदम यांनी दोन धरणासाठी चारशे कोटीहून अधिकचा निधी सरकारच्या तिजोरीतून आणला याबद्दल मला बाप म्हणून योगेशचा अभिमान वाटतो असेही रामदास कदम यांनी आपल्या मुलाचे कौतूक केले आहे.

बसायचं तर बस नाहीतर…तटकरेंच्या मेहुण्याचा रामदास कदमांकडून अपमान; भर सभेत सुनावलं!
sunil tatkare and ramdas kadam
| Updated on: Nov 06, 2026 | 11:41 PM

महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटात नेहमीच हमरी तुमरी सुरु असते. आता ताजे प्रकरण राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे मेहुणे जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्या शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या अपमानाचे आहे. रामदास कदम यांनी खेडमधील पोयनार लघु पाटबंधाऱ्याच्या कार्यक्रमाला बोलावून अजय बिरवटकर यांचा खुर्चीवरुन अपमान केला होता. त्यावरुन आता अजय बिरवटकर यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. उतरती कळा लागलं की माणसाची अशीच आगपाखड सुरू होते असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तटकरेंच्या मेहुण्यांचा अपमान केल्याने आता सुनिल तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळाच्या चौकशीत 25 वर्षे अडकलेल्या खेड मधील पोयनार लघु पाटबंधाऱ्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात 25 वर्षानंतर रखडलेल्या पोयनार प्रकल्पाला 267 कोटी निधी मंजूर झाल्याने रामदास कदम यांनी त्यांचे पू्त्राचे कौतूक केले. या भूमिपूजनाच्या वेळी रामदास कदम यांचा खासदार सुनील तटकरे यांच्यावरचा राग पुन्हा उफाळून आला. या कार्यक्रमात सुनील तटकरे यांच्या मेहुण्याला खुर्चीवरून रामदास कदम यांनी खडे बोल सुनावले.भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची आणि अजय बिरवटकर यांच्याशी शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी कदम म्हणाले की बसायच तर बस नाहीतर जा. त्यावरुन आता अजय बिरवटकर यांनी फेसबुक पोस्ट करत आपला त्रागा व्यक्त केला आहे.

Loading...

वादाला नवी किनार

भर सभेत जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अजय बिरवटकर यांना रामदास कदम यांनी झापल्यामुळे आता सुनील तटकरे विरुद्ध रामदास कदम वादाला नवी किनार मिळाली आहे. भूमिपूजनाच्या कामाला बोलवून तटकरेंचा अपमान करायचा हेतू नव्हता.जलपूजन तटकरेंच्या हस्ते करू असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे. विकास कामात राजकारण आणणार नाही, निवडणुकीच्या काळात कोणाला निवडून आणायची आणि कोणाला आपटायचे हे आम्ही शिकलो आहोत असेही म्हणत रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us