AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam : रामदास कदम यांचा आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट, दाव्यानं खळबळ

बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवरच होता, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे, त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठा दावा केला असून, या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ramdas Kadam : रामदास कदम यांचा आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट, दाव्यानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 2:38 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता, कदम यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब  यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते, त्यानंतर आज पुन्हा एकदा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांनी कदम यांच्यावर डान्सबारवरून आरोप केले होते, त्या आरोपांना उत्तर देताना कदम यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

नेमकं काय म्हणाले कदम?  

तो डान्सबार नव्हता. फक्त ऑर्केस्ट्रा होता, त्याचं परमिशन होतं. फक्त कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार डान्सबार म्हणून बदनाम करण्यात आलं. मी कोर्टात जात आहे. हे हॉटेल ३० वर्षापासूनचं आहे. एक तरुणी विक्षिप्त हावभाव करत होती. म्हणून मी त्या शेट्टीला काढलं. परवाना रद्द केला. दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले. झोपेतून जागे झाले. मुलींचा पैसे खाणारा मी नाहीये.

विलेपार्ले येथील एसआरएची योजना सुरू आहे. ती अजून पूर्ण झाली नाही. माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे. अनिल परब यांनी 8 हजार मराठी माणसांना दम दिला. घरं खाली करा म्हणून,  मी तुम्हाला फ्लॅट देईन सांगितलं. उद्घाटन झालं त्यावेळी अनिल परब व्यासपीठावर होते. या ८ हजार लोकांना फक्त एक वर्षाचं भाडं दिलं. ही मराठी माणसं ९ वर्षापासून मुंबईच्या बाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. आम्ही देशोधडीला लागले. बिल्डरने मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाईक वाटल्या. हे माझं म्हणणं नाही. तिथल्या रहिवाश्यांचं अॅफिडेव्हिट आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट आता कदम यांनी केला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?