AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच…’ रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच...' रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं
| Updated on: Mar 01, 2025 | 4:14 PM
Share

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, असा घणाघात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांना देखील सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम?

रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधींचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपली, बाळासाहेबांचे विचार जपले. संजय राऊत भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केलं आहे, असं म्हणत त्यांंनी संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला.

दिवा विझताना आधी फडफडतो तशीच फडफड सध्या संजय राऊत यांची चालू आहे. आकाशाकडे बघून थुंकलो की ती थुंकी पुन्हा आपल्याच तोंडावर उडते याचे त्यांना भान आहे का? यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच नाही तर दिवसाही स्वप्नात दिसतात. कारण त्यांनी तुमचा नायनाट केला, भ्रष्टाचार थांबवला. त्यामुळे लढाईच्या वेळी मोघलांना पाण्यामध्ये जसे संताजी -धनाजी दिसायचे तसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत यांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतता.  तुम्हाला महाराष्ट्र वैतागला आहे, तुम्हाला चॅनलवर पाहिलं की लोकं चॅनल बदलतात, पाला मेल्यानंतर शेपटी वळवळते आता तेवढीच तुमची शिवसेना शिल्लक आहे, असा जोरदार हल्लाबोल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत आता कदम यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती