पर्यावरण संवर्धनासाठी 21 वर्षीय तरुणीची भ्रमंती, सायकलवरुन महाराष्ट्रभर प्रवास

पर्यावरण संवर्धनासाठी एक मुलगी महाराष्ट्रभर भ्रमण करण्यासाठी निघाली आहे. (Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

पर्यावरण संवर्धनासाठी 21 वर्षीय तरुणीची भ्रमंती, सायकलवरुन महाराष्ट्रभर प्रवास
प्रणाली चिकटे

जळगाव : पर्यावरण संवर्धनासाठी एक मुलगी महाराष्ट्रभर भ्रमण करण्यासाठी निघाली आहे. या मुलीच्या साहसाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. प्रणाली चिकटे असे या मुलीचे नाव असून ती अवघ्या 21 वर्षांची आहे. (Pranali Chikte 21 year old Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी ही 21 वर्षाची प्रणाली महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करत घरातून निघाली आहे. मुक्ताईनगरात पाच हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पार केला. त्यामुळे गाव पातळीवर तसेच इतर सर्व ठिकाणी प्रणाली ध्येयाचे आणि साहसाचे कौतुक होत आहे. अनेक ठिकाणी तिचे स्वागत केले जात आहे. एकटी मुलगी महाराष्ट्रभर प्रवासाला निघाल्याने तिच्या साहसाचे विशेष कौतुक केले जात आहे.

राज्यातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती, महिला सशक्तीकरणाचा जागर करत प्रणालीने सायकल भ्रमंतीचा निर्धार केला. प्रणाली राज्यभरातील सायकल भ्रमंतीसाठी 20 ऑक्टोबर 2020 जनजागृतीसाठी घरून निघाली.

Pranali Chikte

प्रणाली चिकटे

तिचा हा सायकल भ्रमंतीचा प्रवास नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. सध्या ती मुक्ताईनगरला आहे. विविध संस्थेच्या माध्यमातून तसेच गाव पातळीवर तिच्या साहसाचे आणि ध्येयाचे कौतुक केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी तिचा सत्कार सभारंभही आयोजित करण्यात आला आहे. (Pranali Chikte 21 year old Girl Travel All Maharashtra For Environmental Conservation)

संबंधित बातम्या : 

मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर, रंगनाथ पठारे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा: मुख्यमंत्री

Published On - 8:43 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI