पतीच्या रेव्ह पार्टीनंतर रोहिणी खडसेंना झटका? पोलिस आयुक्तांसोबतची भेट अचानक रद्द, पडद्यामागील घडामोडींना वेग

Pune Rave Party Case : पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकली आणि यामधून चक्क एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली. यानंतर धक्कादायक खुलासे या रेव्ह पार्टीबद्दल झाली आहेत.

पतीच्या रेव्ह पार्टीनंतर रोहिणी खडसेंना झटका? पोलिस आयुक्तांसोबतची भेट अचानक रद्द, पडद्यामागील घडामोडींना वेग
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 12:00 PM

पुणे पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टी उधळून टाकली. मात्र, या रेव्ह पार्टीमधून चक्क ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांपासून खडसे हे मंत्री गिरीष महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या जावयावर अशाप्रकारची कारवाई झाल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या. फक्त चर्चाच नाही तर अनेकांनी थेट संशय देखील व्यक्त केला.

जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे हे थेट माध्यमांपुढे आले आणि त्यांनी स्पष्ट केले की, माझे आणि जावयाचे काही बोलणे झाले नसून मी देखील हे प्रकरण टीव्हीवरच बघितले आहे. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्यासोबत काही बोलणे होऊ शकले नाही. यामध्ये जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शासन झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

पतीला अटक झाल्यानंतर काही तासांनी रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्या आज थेट पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार होत्या. मात्र, त्यांची पोलिस आयुक्तांसोबतची ही भेट अचानक रद्द झालीये. मात्र, पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. पती प्रांजल यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे या पोलिस आयुक्तांनी भेट घेणार होत्या.

रोहिणी खडसे यांची पोलिस आयुक्तांसोबतची भेट रद्द होण्याचे कारण हे अद्यापपर्यंत कळू शकले नाहीये. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रोहिणी खडसे या सध्या पुण्यातच आहेत पण त्या पोलिस आयुक्त कार्यालयाकडे येणार नाहीत. यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रोहिणी खडसे हे रेव्ह पार्टी प्रकरणाबद्दलची माहिती घेणार होत्या. मात्र, ही भेट रद्द झालीय.

रोहिणी खडसे यांनी आपल्या घटस्फोटानंतर बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर याच्यासोबत लग्न केले. प्रांजल खेवलकर हे व्यावसायिक असून त्यांच्या काही कंपन्या देखील आहेत. नुकताच एक अजून मोठा आरोप केला जात असून प्रांजल यांच्या रेव्ह पार्टीमध्ये काही सराईत गुन्हेगार देखील सहभागी होते.