AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण कर्जमुक्ती आणि पीकविम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. तुपकरांच्या खालावलेल्या तब्येतीमुळे शेतकरी संतप्त झाले असून राज्यभरात विविध आंदोलने केली जात आहेत, ज्यात मुंबईतील जलसमाधी आंदोलनचा समावेश आहे. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची मागणी आहे.

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक
रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ मुंबईत जलसमाधी आंदोलन
| Updated on: Jun 18, 2026 | 10:48 AM
Share

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. दरम्यान तुपकर यांची प्रकृती खालावत चालल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होत आहेत. राज्यभरात आंदोलन होत असतानाच मुंबईतही त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून जलसमाधी आंदोलन केलं जात आहे. तुपकर यांना सपोर्ट करण्यासाठी मुंबईतही त्यांचे कार्यकर्ते , पदाधिकारी जलसमाधी आंदोलन करत आहेत. भरसमुद्रात कार्यकर्ते, पदाधिकारी उतरले असून मोठे थरारक वातावरण निर्माण झाले.

मुंबईतील अरबी समुद्रत अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथे तुपकरांच्या समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी उड्या मारल्या आहेत. सरकारने कर्जमाफीची योजना लागू केली, मात्र ती फसवी योजना आहे, असं त्यांचं म्हणणं आहकांही. तुपकरांच्या आंदोलनला सपोर्ट करत त्यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. काही लातूरवरून आले, काहींनी समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. मोदी सरकार हाय हाय असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील सुरू केली आहे.

अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जाळले टायर

दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर वाशिममध्ये संतप्त शेतकऱ्यांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा दिला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

राज्यभरात ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांकडून आक्रमक आंदोलनं

नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून त्यांची तब्येत प्रचंड खालावली. साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्याने अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आदी लक्षणे आहेत. दरम्यान तुपकर यांची प्रकृती खालावत चालल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होत आहेत. राज्यभरात आंदोलन होत असताना मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न अज्ञात आंदोलकांकडून करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.तर दुसरीकडे पुणे नागपूर महामार्गावरील मुरादपुर फाटा येथे बंद पडलेला टोलनाक सुद्धा आंदोलन कृत्यांनी पेटवून दिला आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता आता वाढतच चालली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी