कोलकात्यात अमित शाहांचं भाषण, महाराष्ट्रात रविंद्र चव्हाणांचा पलटवार; काँग्रेसला घेरण्यासाठी कोणते मुद्दे मांडले?

Ravindra Chavan On Rahul Gandhi: काँग्रेसचे राजकारण म्हणजे सोयीनुसार रंग बदलणे आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला दीर्घकाळ मुख्यमंत्री निवडता आला नाही, तिथे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सरकारे स्थापन केली, असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

कोलकात्यात अमित शाहांचं भाषण, महाराष्ट्रात रविंद्र चव्हाणांचा पलटवार; काँग्रेसला घेरण्यासाठी कोणते मुद्दे मांडले?
| Updated on: Oct 09, 2026 | 8:19 PM

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत राजकीय सोयीनुसार आपली भूमिका बदलण्याचा आरोप केला आहे. चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोलकाता येथील भाषण सोशल मीडियावर शेअर करून काँग्रेसच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या दुटप्पी राजकारणावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोलकाता येथील व्हिडिओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री बोलत होते. यामुळे आता राजकारण तापलं आहे.

Loading...

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल ४०-४० वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते याबद्दल तोंडातून ‘ब्र’ देखील काढणार नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच!’

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशभरातील विविध राज्यांमध्ये किती वर्षांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा पाढा वाचला. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी नेते झाल्यापासून देशातील नागरिक वेळोवेळी त्यांच्याविरोधात कौल देत आहेत आणि राहुलजींच्या नेतृत्वात ‘इंडिया आघाडी’ पुन्हा मोडण्यास सुरुवात झाली आहे.’ काँग्रेसच्या या अपयशावर बोट ठेवताना रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपची भूमिका ठामपणे मांडली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या राजकीय स्थितीवर आणि निवडणुकीतील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विविध राज्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री मिळालेला नाही. अमित शाह यांनी काँग्रेसला आपल्या निवडणुकीतील पराभवातून धडा घेऊन आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us