AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य भरतीमध्ये फेरपरीक्षा, चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 572 उमेदवारांची यादी जाहीर

परीक्षेबाबत तक्रारी असूनही परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यास संस्थेने मात्र, चक्क निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर आरोग्य विभागाने या उमेदवारांना 7 डिसेंबरच्या आत नियुक्त्या देण्याचा घाट घातला होता.

आरोग्य भरतीमध्ये फेरपरीक्षा, चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या  572 उमेदवारांची यादी जाहीर
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 22, 2021 | 10:14 AM
Share

नाशिकः आरोग्य भरती परीक्षेतला गोंधळ निस्तारायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या 11 संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाबतीत आणखी कोणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य भरती परीक्षेतील तक्रारींचे निराकरण झाल्यानंतरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

दोन वेळा परीक्षा रद्द

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत. अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.

चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या

आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यात गट ‘क’ च्या 11 संवर्गातील 572 उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. आता या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे.

न्यास मात्र घोड्यावर

इतके सारे प्रकार होऊन. परीक्षेबाबत तक्रारी असूनही परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यास संस्थेने मात्र, चक्क निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर आरोग्य विभागाने या उमेदवारांना 7 डिसेंबरच्या आत नियुक्त्या देण्याचा घाट घातला. मात्र, परीक्षेत झालेल्या गोंधळावर साऱ्यांचे मौन होते. हा प्रश्न शेवटी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत गेला. त्यांनी नियुक्त्यांबाबत पारदर्शक प्रक्रिया राबणार असल्याचे म्हटले. जिथे परीक्षेत गोंधळ झाला, तक्रारी आहेत, त्यांचे निराकरण केल्याशिवाय नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. त्यानंतर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!

नाशिकचे दिल्ली होऊ नये म्हणून प्रयत्न, प्रदूषणावर Go Green Cab चा उतारा; महिला उद्योजकांचा अनोखा उपक्रम

Follow Us
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे