
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आमदार सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांनी स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीसाठी वापरण्यात आलेल्या बॅनरवर कुठेही आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे सावंत कुटुंबातील हा वाद स्वतंत्र दिशेने जात असल्याचे संकेत मिळत असून, धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. एकीकडे आमदार तानाजी सावंत हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे धनंजय सावंत हे भाजपच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्नही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. धनंजय सावंत नेमके कोणत्या पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी त्यांच्या हालचालींमुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच जिल्हा परिषद निवडणुकीत काय वळण घेणार, आणि धनंजय सावंत हे कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
दरम्यान तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे आता पुतण्याच नाही तर भावाने देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि दुसरा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांनी देखील तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजप प्रवेश अनेक दिवसापासून रखडला आहे. दरम्यान प्रवेश रखडण्यामागचं खरं कारण शिवाजीराव सावंतानी थेट मेळाव्यातुन जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. माझा भाऊ तानाजी सावंतानी मुख्यमंत्र्याना घेऊ नका असं सांगून माझा पक्ष प्रवेश थांबवला. कुटूंबातील दुसरा कोणी राजकारणात पुढे येऊ नये असा डाव आणी तशी मानसिक स्थिती त्यांची झाली असून, भावाला कुणाची तरी नजर लागली आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे, त्यामुळे आता सावंत कुटुंबात आता काका विरुद्ध पुतण्यात -भाऊ असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे.