Gautami Patil: आरोप करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुलीचा यूटर्न! मानले गौतमी पाटीलचे आभार

गेल्या काही दिवसांपासून नृत्यांगना गौतमी पाटीलही चर्चेत आहे. तिच्या कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले. आता रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमीचे आभार मानले आहेत.

Gautami Patil: आरोप करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुलीचा यूटर्न! मानले गौतमी पाटीलचे आभार
Gautami Patil
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Oct 17, 2025 | 12:22 PM

पुण्यातील सिंहगड रोडवर गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला. कारने रिक्षाला मागून जबर धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. मात्र, गार कारचालक तेथून पळून गेला. काही वेळानंतर रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नसली तरी गाडी तिची असल्यामुळे चर्चा सुरु होती. कारची मालक असलेल्या गौतमीने मदत न केल्यामुळे संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता तिच मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसून आली. इतकच नाही तर तिने गौतम पाटीलचे आभार देखील मानले.

काय म्हणाली रिक्षा चालकाची मुलगी?

जे काही आरोप केले होते ते आम्हाला पुरावे मीळत नव्हते. आता मला पोलीस प्रशासानाने सर्व पुरावे दिले आहेत. गौतमी पाटील जरी भेटायला आल्या तरी कायदेशीर प्रक्रीया सुरू राहील. कोर्टात केस लढली जाईल. गौतमी पाटीलकडून मी कोणतीही मदत घेतली नाही. माणुसकी म्हणुन गौतमी पाटील आम्हला भेटायला आल्या आहेत. काल त्या भेटायला आल्या होत्या. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे काढायचा प्रयत्न केला आशी त्यांनी माहीती दिली. आम्ही कोणतीही १० लाख, १५ लाख रूपयाची मागणी केली नाही. गौतमी पाटील यांनी आम्हाला कधीही मदत लागली तर ती द्यायला तयार आहे आसे सांगितले. परंतु आता तरी मी सध्या समर्थ आहे माझ्या वडिलांची काळजी घ्यायला. गौतमी पाटील यांनी आमची हालहवाल माहिती घ्यावी हिच इच्छा होती. त्या आल्या त्यांनी भेट घेतली आहे असे रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळे यांनी म्हटले.

वाचा: एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष! तपासात जे समोर आले त्याने पोलिसही हादरले

काय आहे प्रकरण?

सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती. या रिक्षेला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षा तीन वेळा पटली झाली. गाडीतील लोक उतरले आजूबाजुला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत तेथून निघून गेले. त्यानंतर काही लोकांनी रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल केले.