मोठी बातमी! उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंद, मनसेची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय?

मोठी बातमी समोर येत आहे, आज मनसेची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या संपूर्ण राज्यात रिक्षा सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. जर रिक्षा सेवा बंद राहिली तर प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंद, मनसेची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय?
उद्या रिक्षाचालकांचं आंदोलन
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 5:04 PM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा रॅपिडोचा मुद्दा तापण्याची चिन्हं आहेत. मनसेनं रॅपिडोविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रॅपिडोमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याच संदर्भात नुकतीच मनसेसह सर्वपक्षीय रिक्षा वाहतूक संघटनांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय नाईक? 

Loading...

संपूर्ण देशात ही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे, महाराष्ट्र सरकारनेही या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला सूट दिली आहे. अजूनपर्यंत कोणतीही परवानगी नसताना रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून दुचाकी मोटरसायकलवरून प्रवासी वाहतूक केली जाते, ती आजही सुरू आहे.  अनेक संघटनांनी विरोध केला आहे, आयुक्तांकडे पत्रव्यवहारही केला आहे, तरीही मुंबईसह पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे.

याच संदर्भात ऑटो रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी येत्या 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती  देखील यावेळी  संजय नाईक यांनी दिली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे आता उद्या संपूर्ण राज्यात रिक्षा बंद राहण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना नाईक म्हणाले की, अशा कॉन्ट्रॅक्ट गाड्यांच्या माध्यमातून असुरक्षित प्रवासी वाहतुकीचे माध्यम देशात येऊ पाहत आहे, काही ठिकाणी सुरू झाले आहे. अनेक प्रश्न आजही सरकार दरबारी अनुत्तरित आहेत, परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा परिवहन मंत्री यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळालेले नाही त्यामुळे बाबा कांबळे यांनी रॅपिडोच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत.

कायद्यानुसार कोणत्याही वाहनाला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ड्रायव्हरकडे बॅच असायलाच पाहिजे, पण रॅपिडोच्या दुचाकी चालकांकडे बॅच नाही.  माझी टॅक्सी मुंबई शहराबाहेर जाणार नाही, पण रॅपिडो बुक केली तर ती मुंबईवरून थेट पुण्यालाही  जाऊ शकते.  प्रवासी वाहतूक करायची असेल तर पिवळी नंबर प्लेट असायला पाहिजे, ती अजूनपर्यंत नाही.  ही प्रवासी वाहतूक कायमची बंद करावी, हीच आमची पहिली मागणी आहे, असं यावेळी नाईक यांनी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us